विहिरीत पडलेल्या नीलगायीला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:19 AM2021-03-05T04:19:00+5:302021-03-05T04:19:00+5:30

गझलदीप पुरस्कारासाठी गझलसंग्रह पाठवा मूर्तिजापूर: गझलदीप प्रतिष्ठानातर्फे गझलदीप पुरस्कारासाठी गझलसंग्रह पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. १ जानेवारी ते ३१ ...

Survival of the Nilgai in the well | विहिरीत पडलेल्या नीलगायीला जीवदान

विहिरीत पडलेल्या नीलगायीला जीवदान

Next

गझलदीप पुरस्कारासाठी गझलसंग्रह पाठवा

मूर्तिजापूर: गझलदीप प्रतिष्ठानातर्फे गझलदीप पुरस्कारासाठी गझलसंग्रह पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबरपर्यंत प्रकाशित झालेल्या गझलसंग्रहांचा विचार करण्यात येणार आहे. गझलसंग्रह दोन प्रतींमध्ये परिचय, दोन पासपोर्ट फोटोसह संदीप वाकाेडे रा. सिरसो या पत्त्यावर पाठवावेत.

प्रदेश उपाध्यक्षपदी नीलेश ढाकरे

पातूर: संत रविदास चर्मकार युवा फाऊंडेशनच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नीलेश ढाकरे यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय महासचिव नरेंद्र वाडेकर यांनी त्यांची नियुक्ती केली. ढाकरे हे राष्ट्रसंत विचारपीठाचे मुख्य समन्वयक, कलादूत संघाचे जिल्हा संयोजक व शिक्षण परिषदेत कार्यरत आहेत.

रिधोरा येथे संत रविदास महाराज जयंती

रिधोरा: रिधोरा येथे संत रविदास महाराज जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच संजय अघडते, उपसरपंच उषा वाडकर, मंगेश गवई, विशाल दंदी, राजाभाऊ देशमुख, पवन अग्रवाल, वैशाली दंदी, शारदा खंडारे, पूजा दांदळे, कुंदन चौधरी, उमा तेलगोटे सचिव रवींद्र इंगळे, सैय्यद अकबर, धमेंद्र दंदी उपस्थित होते.

लाकडाने भरलेला ट्रॅक्टर पकडला

खेट्री: चतारी परिसरात ३ मार्च रोजी सकाळी वन विभागाने लाकडाने भरलेला ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केली. वन विभागाने एमएच ३० एबी ५०२४ क्रमांकाचा ट्रॅक्टर व लाकूड जप्त केले. आरोपी महेंद्र प्रल्हाद वेले (रा. वाडेगाव) याच्याविरुद्ध कारवाई केली. ही कारवाई वनपाल एस.बी. ढेंगे, वनरक्षक एल.बी. खोकड यांनी केली.

फोटो:

वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

अकोट: चंडिकापूर येथील ८२ वर्षीय वृद्धाने वडाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३ मार्च रोजी घडली. २ मार्च रोजी रात्री घरातील सर्व सदस्य झोपले असताना, त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येमागील कारण स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी अकोट ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

पिंजर परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढला

पिंजर: पिंजरसह परिसरातील गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही नागरिक बेफिकीर दिसत आहेत. पिंजरसह महागाव, भेंडीमहाल, पाराभवानी गावांमध्ये कोरोनाचे पाच रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

Web Title: Survival of the Nilgai in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.