अधीक्षक अभियंत्यांचे निलंबन रद्द करा!
By admin | Published: February 27, 2016 01:34 AM2016-02-27T01:34:36+5:302016-02-27T01:34:36+5:30
फुले, आंबेडकरी विद्यार्थी युवक संघटनेचे धरणे.
अकोला: महावितरणच्या अकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता यशवंत कांबळे यांच्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप करताना फुले, आंबेडकरी विद्यार्थी युवक संघटना, ब्लू पँथर, बहुजन प्रकाश संस्था महासंघ या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देऊन निषेध व्यक्त केला.
अधीक्षक अभियंता पदावर असताना यशवंत कांबळे यांनी मंडळातील नादुरुस्त रोहित्रे दुरुस्त करण्याची धडक मोहीम हाती घेऊन शेतकर्यांना दिलासा दिला. तसेच थकबाकी वसुलीचाही प्रश्न मार्गी लावला. लोकप्रतिनिधींनी सुचविलेली सर्व कामे तातडीने पूर्ण केली. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने शासकीय धोरणाची अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले. त्यानंतरही कांबळे यांच्यावर विविध आरोपांचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले. ही कारवाई अन्यायकारक आहे. त्यामुळे त्यांचे निलंबन तातडीने रद्द करावे, अशा आशयाने निवेदन संघटनेच्या व तीने जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. यावेळी फुले, आंबेडकरी राष्ट्रीय विद्यार्थी युवक संघटनेचे अध्यक्ष महेंद्र भोजने, जयकुमार दामोदर, बहुजन प्रकाश संस्था महासंघाचे अध्यक्ष साहेबराव इंगळे, मनोहर बनसोड, जीवन दारोकार, ब्लू पँ थरचे अध्यक्ष मनोज शिरसाट, आनंद गवई, चंद्रशेखर नकाशे, पंकज वाढवे, प्रा. सुरेश पाटकर आदींची उपस्थिती होती.