अभियंत्यासह लाईन हेल्पर निलंबीत
By admin | Published: June 28, 2014 10:34 PM2014-06-28T22:34:16+5:302014-06-29T00:52:39+5:30
प्राप्त पुराव्याच्या आधारे कनिष्ठ अभियंता व लाईन हेल्पर यांना निलंबीत करण्यात आले.
बुलडाणा : जिल्हा विज वितरण कंपनीची बैठक खा. प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाली. या बैठकीत खा.जाधव, आ.विजयराज शिंदे, आ.संजय रायमूलकर यांच्या उपस्थितीत शेकडो विज ग्राहकांनी आपल्या तक्रारी विज वितरण कंपनीकडे मांडल्या. यानुसार प्राप्त पुराव्याच्या आधारे कनिष्ठ अभियंता व लाईन हेल्पर यांना निलंबीत करण्यात आले.
यावेळी विजवितकरण कंपनीबाबत ग्राहकांच्या विविध तक्रारीवर चर्चा करुन त्याचे निराकरण करण्यात आले. यावेळी ग्राहकांनी केलेल्या तक्रारी व पुरावे यांच्या आधारावर बीबी विद्युत केंद्राचे लाईन हेल्पर गणेश ढाकणे आणि मेहकरचे कनिष्ठ अभियंता के.एस.होणे यांना निलंबित करण्याचे तसेच आलेल्या अनेक तक्रारीच्या प्रकणात चौकशीचे आदेश खा.जाधव यांनी दिले.
या बैठकीला जिल्हा विद्युतकरण समितीचे सदस्य बबनराव सुपे, विद्युत वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता किशोर शेगोकार, जिल्हा विद्युत निरिक्षक अजित शुल्क यांच्यास अभियंता, सहाय्यक अभियंता व कर्मचारी यांच्यासह जिल्हाभरातील तीनशेच्यावर विज ग्राहक तक्रारकर्ते उपस्थित होते.