उपायुक्तांच्या विरोधातील सभा सुरू होण्यापूर्वीच स्थगित
By admin | Published: December 3, 2014 01:15 AM2014-12-03T01:15:16+5:302014-12-03T01:15:16+5:30
सत्तापक्षातील नगरसेवकासोबत झालेला वांदग प्रकरणाच्या पृष्ठभूमीवर आयोजित सभा सुरू होण्यापुर्वीच स्थगीत; पदाधिका-यांमध्ये समन्वयाचा अभाव.
अकोला : दुकानांचे नामफलक काढण्याच्या मुद्दय़ावर सत्तापक्षातील नगरसेवकांसोबत झालेल्या वादंगामुळे उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या विरोधात मंगळवारी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा सुरू होण्यापूर्वीच स्थगित करण्यात आली. महापौर उज्ज्वला देशमुख यांनी सकाळच्या सत्रा झालेल्या स्थगित सभेतच विशेष सभा स्थगित करण्यात आल्याची घोषणा केल्याने सत्तापक्षाच्या नैतिकतेवर विरोधकांनी प्रश्नचिन्हं निर्माण केले.
मनपा उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी गांधी रोडवरील दुकानांचे नामफलक काढण्याची मोहीम राबविली. ती वादाच्या भोवर्यात सापडली. यानंतर याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेले भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक विजय अग्रवाल यांच्याशी धक्काबुक्की झाल्याचा प्रकार २७ नोव्हेंबर रोजी उपायुक्तांच्या दालनात घडला. या प्रकरणामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी उपायुक्त चिंचोलीकर यांच्या विरोधात निलंबनाचा ठराव घेण्यासाठी २ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता मनपाच्या मुख्य सभागृहात विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, महापौर उज्ज्वला देशमुख यांनी सकाळी स्थगित सभेमध्येच उपायुक्तांसाठी आयोजित केलेली विशेष सभा स्थगित करीत असल्याचे जाहीर केले. सत्ताधार्यांच्या या भूमिकेवर विरोधी पक्ष काँग्रेसने जोरदार हल्ला चढवला
भाजपचा ह्ययू टर्नह्ण!
दुकानांच्या नामफलकावरून उपायुक्त चिंचोलीकरांसोबत वाद झाल्याचा मुद्दा निलंबनाच्या ठरावापर्यंंत पोहोचला. महापौरांनीसुद्धा पत्रकार परिषदेत अधिकार्यांची मनमानी चालणार नसल्याचे स्पष्ट केले होते; परंतु ऐन सभेच्या दिवशी भाजपने ह्ययू टर्नह्णघेतला.
रात्रीच्या बैठकीनंतर फिरविला निर्णय!
भाजप नेते व पदाधिकार्यांच्या उपस्थितीत क ाही मनपा अधिकार्यांची सोमवारी रात्री प्रदीर्घ चर्चा झाली. अधिकार्यांनी मनमानीला आवर घालण्याचे आश्वासन दिल्यास विशेष सभा स्थगित करण्यावर एकमत झाले. त्यावर मनपाच्या कामाकाजात सुधारणा करीत समस्या निकाली काढण्यासाठी काही दिवसांचा अवधी देण्यात यावा, अशी विनंती मनपा अधिकार्यांनी केल्याची माहिती आहे.