वाडेगावातील रास्त भाव दुकानाचा परवाना निलंबित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 01:38 PM2017-10-17T13:38:23+5:302017-10-17T13:38:33+5:30

बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील माजी सरपंच आसिफ खान यांच्या रास्त भाव दुकानाचे प्राधिकारपत्र निलंबित करण्याचा आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे यांनी सोमवारी दिला. रास्त भाव दुकानदार यांच्या तपासणीमध्ये गहू कमी आढळून येणे व तांदूळ जास्त आढळून आल्याप्रकरणी दोषी ठरवत धान्याची अफरातफर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. आसिफ खान मुस्तफा खान यांची चौकशी मेहकर पोलिसांनी केल्यानंतर त्यांच्या दुकानाची तपासणी करण्यात आली होती.

Suspended store license in Vadegaon! | वाडेगावातील रास्त भाव दुकानाचा परवाना निलंबित!

वाडेगावातील रास्त भाव दुकानाचा परवाना निलंबित!

googlenewsNext
ठळक मुद्देआसिफ खान यांच्या दुकानातील धान्याची अफरातफर प्रकरण






अकोला - बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील माजी सरपंच आसिफ खान यांच्या रास्त भाव दुकानाचे प्राधिकारपत्र निलंबित करण्याचा आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे यांनी सोमवारी दिला. रास्त भाव दुकानदार यांच्या तपासणीमध्ये गहू कमी आढळून येणे व तांदूळ जास्त आढळून आल्याप्रकरणी दोषी ठरवत धान्याची अफरातफर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. आसिफ खान मुस्तफा खान यांची चौकशी मेहकर पोलिसांनी केल्यानंतर त्यांच्या दुकानाची तपासणी करण्यात आली होती.
बुलडाणा जिल्ह्यात धान्याचा काळाबाजार झाल्यानंतर मेहकर पोलिसांनी गव्हासह अन्नधान्याचा एक ट्रक काळाबाजारात धान्य नेत असताना पकडला होता. या प्रकरणी वाडेगाव येथील आसिफ खान मुस्तफा खान यांची चौकशी मेहकर पोलिसांनी केली होती. त्याचा आधार घेत जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे यांनी आसिफ खान यांच्या वाडेगाव येथील रास्त भाव दुकानाची तपासणी करण्याचा आदेश बाळापूर तहसीलदारांना दिला होता. या आदेशावरून जिल्हा पुरवठा अधिकाºयांकडे चौकशी अहवाल सादर करण्यात आला होता. दोषारोपाच्या आधारे परवान्याविरुद्ध कारवाई करण्यात येऊ नये, असे आसिफ खान यांनी लेखी स्पष्टीकरण पुरवठा अधिकाºयांना दिले होते. मात्र पुरवठा अधिकाºयांनी शिधावस्तूंचे वाटप पारदर्शी न झाल्याची तसेच धान्याची अफरातफर झाल्याचा संशय व्यक्त केला होता. पुरवठा अधिकाºयांनी दिलेल्या आदेशात म्हटले, की वाडेगाव येथील दुकानाचे प्राधिकारपत्र पुढील चौकशीपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. रास्त भाव दुकानदार यांनी सप्टेंबर महिन्यात किती अन्नधान्याची उचल केली व किती धान्याचे वाटप शिधापत्रिकाधारकांना केले, याबाबत २५ टक्के शिधापत्रिकाधारकांचे बयान आता चौकशीदरम्यान तहसीलदारांना घ्यावे लागणार आहे. एक महिन्याच्या आत पुरवठा अधिकाºयांना अहवाल सादर करावा लागणार आहे. तसेच शिधापत्रिकाधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून रास्त भाव दुकानास जोडलेल्या शिधापत्रिका नजिकच्या रास्त भाव दुकानास जोडण्याचे आदेशात नमूद आहे.

Web Title: Suspended store license in Vadegaon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.