मनपाच्या ३२ कर्मचा-यांचे निलंबन?

By admin | Published: June 6, 2015 01:43 AM2015-06-06T01:43:11+5:302015-06-08T01:53:27+5:30

उपायुक्तांचा प्रस्ताव; आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष.

Suspension of 32 employees? | मनपाच्या ३२ कर्मचा-यांचे निलंबन?

मनपाच्या ३२ कर्मचा-यांचे निलंबन?

Next

अकोला : मालमत्ता पुनर्मूल्यांकन मोहिमेत प्रशासनाला पूर्वसूचना न देता कामावर गैहजर राहणार्‍या ३२ कर्मचार्‍यांच्या निलंबनाचा प्रस्ताव उपायुक्त माधुरी मडावी यांनी शुक्रवारी आयुक्त सोमनाथ शेटे यांच्याकडे सोपवला. संबंधित कर्मचारी आस्थापनेवरील असल्यामुळे मनपा आयुक्त काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मालमत्ता कर विभागाच्या माध्यमातून उत्पन्नात वाढ करण्यासाठी महापालिका प्रशासनाने मालमत्ता पुनर्मूल्यांकनाची मोहीम सुरू केली आहे. उपायुक्त माधुरी मडावी यांच्या उपस्थितीत दक्षिण झोनमधील मोहीम आटोपल्यानंतर १ जूनपासून पूर्व झोनमध्ये मोहिमेला सुरुवात करण्यात आली. यादरम्यान पूर्वसूचना न देता मनपाचे क्षेत्रीय अधिकारी तसेच अभियंता, २६ शिक्षक-शिक्षिका आणि जलप्रदाय विभागातील तीन कर्मचारी सतत गैहजर राहत असल्याचा ठपका ठेवत उपायुक्त मडावी यांनी एकूण ३२ कर्मचार्‍यांच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव पुढील अंमलबजावणीसाठी आयुक्त सोमनाथ शेटे यांच्याकडे पाठविण्यात आला. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात एकाच वेळी ३२ कर्मचार्‍यांच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यासंदर्भात आयुक्त शेटे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

Web Title: Suspension of 32 employees?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.