आमदारांचे निलंबन; भाजपची जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 10:22 AM2021-07-07T10:22:32+5:302021-07-07T10:22:39+5:30
BJP's Protests in front of Collector's office : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आघाडी सरकारच्या विराेधात जाेरदार निदर्शने करण्यात आली.
अकोला : ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून निर्माण झालेल्या गदाराेळामुळे विधानसभेत भारतीय जनता पार्टीच्या १२ आमदारांचे निलंबन केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आघाडी सरकारच्या विराेधात जाेरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी काही काळ रस्ता बंद करण्यात येऊन विराेधात नारेबाजी करण्यात आली.
राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षणावरून तिढा निर्माण झाला आहे. आरक्षण मिळेपर्यंत संघर्ष करतच राहू, असा इशारा याप्रसंगी महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी दिला. पावसाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षणाचा आवाज दाबण्यासाठी सरकारने १२ आमदारांचे निलंबन करणे ही लाेकशाहीची मूल्ये पायदळी तुडविण्यासारखे असल्याची टीका अग्रवाल यांनी केली. आंदाेलनात महापौर अर्चना मसने, गीतांजली शेगोकार, वैशाली शेळके, माधव मानकर, अंबादास उमाळे, किशाेर मांगटे पाटील, राहुल देशमुख, विजय इंगळे, अजय शर्मा, विनाेद मापारी, सुनीता अग्रवाल, रश्मी अवचार, नीलेश नीनोरे, सिद्धार्थ शर्मा, गिरीश जोशी, पवन पाडिया, निकिता देशमुख, विलास शेळके, अक्षय जोशी, अतुल अग्रवाल, हरिभाऊ काळे, बाळू सोनवणे, उकंडराव सोनवणे, प्रशांत अवचार, सुजित ठाकूर, जान्हवी डोंगरे, विजय परमार, रंजना विंचनकर, संजय बडाेणे, पल्लवी मोरे यांसह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित हाेते.