वीज उद्योग टिकणे ही काळाजी गरज : देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:17 AM2021-01-18T04:17:03+5:302021-01-18T04:17:03+5:30
तेल्हारा : वीज संशोधन कायदा, कामगार कायदा व तीन नवे कृषी कायदे हे सर्वसामान्यांच्या विरोधात असून, ते त्वरित मागे ...
तेल्हारा : वीज संशोधन कायदा, कामगार कायदा व तीन नवे कृषी कायदे हे सर्वसामान्यांच्या विरोधात असून, ते त्वरित मागे घ्यावे, महावितरणमधील खासगीकरणाची मालिका थांबवून वीज उद्योग टिकवण्यासाठी तयार राहावे, वीज उद्योग टिकणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे कार्याध्यक्ष कॉ सी.एन. देशमुख यांनी केले. ते अकोट विभागाद्वारे आयोजित कामगार सोहळ्यात बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय सल्लागार कॉ दुधाळे, संयुक्त सचिव कॉ सनगाळे, कॉ शैलेश तायडे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य कॉ पी.जी. ढोले, कॉ जी.जे. देशमुख, अकोला झोनल अध्यक्ष कॉ संतोष कोल्हे, सचिव कॉ एन. वाय. देशमुख, कॉ सतीश नवले, कॉ प्रदीप ढेंगे, कॉ सुनीता पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, महाराष्ट्र स्टेट इले. वर्कर्स फेडरेशनची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अकोट विभाग अध्यक्षपदी कॉ. योगेश राऊत, सचिवपदी कॉ. अफसर शाह अन्वर शाह, महिला कॉ सुनंदा अतुल काळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे तेल्हारा शाखा अध्यक्षपदी कॉ संजय माकोडे, सचिवपदी कॉ विठ्ठल शेळके, अकोट शाखा अध्यक्षपदी कॉ बराह, सचिवपदी कॉ हर्षल जांभोळे यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉ अफसर शाह यांनी केले. आभार कॉ निलेश मगर यांनी मानले.