फिरते पथकाव्दारे स्वॅब संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:14 AM2021-06-17T04:14:26+5:302021-06-17T04:14:26+5:30

अकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाव्दारे शहरात झोननिहाय कोरोना चाचणी केंद्र व फिरते पथकाव्दारे ४३२ नागरिकांचे ...

Swab collection by mobile squad | फिरते पथकाव्दारे स्वॅब संकलन

फिरते पथकाव्दारे स्वॅब संकलन

Next

अकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाव्दारे शहरात झोननिहाय कोरोना चाचणी केंद्र व फिरते पथकाव्दारे ४३२ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले. पूर्व झोन अंतर्गत रॅपिड चाचणीसाठी ४१ स्वॅब घेण्यात आले.

एसटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता

अकोला : कोरोना काळात परप्रांतीय मजुरांना सोडण्यासाठी व राज्याबाहेर शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी एसटीची अत्यावश्यक प्रवासी सेवा सुरू करण्यात आली होती. यावेळी कर्तव्यावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना ३०० रुपये प्रतिदिन प्रोत्साहनपर भत्ता देण्याची घोषणा करण्यात आली होती. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.

शहरात पावसाच्या सरी कोसळल्या

अकोला : जिल्ह्यात अद्यापही अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरण्या रखडल्या आहेत. बुधवारी शहरात सायंकाळी ७ वाजता पावसाच्या सरी कोसळल्या. पावसाने वातावरणात थंडावा निर्माण झाला होता.

बियाण्यांचा तुटवडा कायम

अकोला : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ७० हजार १४७ क्विंटल बियाण्यांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली होती; मात्र आतापर्यंत केवळ ५६ हजार ५०३ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. त्यामुळे बियाण्यांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे.

कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी

अकोला : शहरातील कृषी सेवा केंद्रांवर खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांची माेठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. काही भागात चांगला पाऊस आल्याने शेतकरी सुखावला आहे.

भाजीबाजारात गर्दी वाढली

अकोला : काेराेना संसर्ग कमी झाल्याने शिथिलता देण्यात आली. शहरातील भाजीबाजारात गर्दी होत आहे. दरम्यान, गर्दी पांगविण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून नियमित पाहणी केली जाते. तरीदेखील नागरिकांकडून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन हाेत नसल्याने कोरोना विषाणू संसर्गाची भीती उपस्थित हाेत आहे.

डीएपी खत मिळेना; शेतकरी त्रस्त

अकोला : जिल्ह्यात कृषी विभागाच्या लेखी डीएपी खत उपलब्ध आहे; मात्र शेतकऱ्यांना खत मिळत नसल्याने खताचा काळाबाजार तर सुरू नाही ना, अशी शंकाही शेतकऱ्यांमधून उपस्थित केली जात आहे.

शासकीय कार्यालयात नियमांना खाे

अकोला : काेराेना नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केले जात असतानासुद्धा शासकीय कार्यालयांमध्ये याचा विसर पडलेला दिसून येत आहे. शासकीय कार्यालयात असलेल्या सॅनिटायझरच्या बाॅटल रिकाम्या व अडगळीच्या ठिकाणी पडलेले दिसून येत असून मास्कचा वापरही हाेताना दिसून येत नसल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Swab collection by mobile squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.