विदर्भातील बुलडाणा, वर्धा लोकसभा मतदारसंघात ‘स्वाभिमानी’ लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 01:52 PM2018-08-03T13:52:46+5:302018-08-03T13:58:35+5:30

अकोला - स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लोकसभा निवडणुक लढविण्याची तयारी सुरू केली असून, राज्यातील सहा मतदारसंघावर त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. यामध्ये विदर्भातील वर्धा व बुलडाणा या दोन मतदारसंघाचा समावेश आहे.

'Swabhimani' will contest two Lok Sabha constituency in vidarbha | विदर्भातील बुलडाणा, वर्धा लोकसभा मतदारसंघात ‘स्वाभिमानी’ लढणार

विदर्भातील बुलडाणा, वर्धा लोकसभा मतदारसंघात ‘स्वाभिमानी’ लढणार

Next
ठळक मुद्देपुण्यात एका कार्यक्रमामध्ये ही घोषणा केल्यानंतर संघटना पातळीवर मार्चेबांधणी सुरू झाली आहे. तुपकरांना ऐनवेळी म्हाडा मतदारसंघातही उमेदवारी देण्याचीही शक्यता आहे.

 - राजेश शेगोकर 

अकोला - स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लोकसभा निवडणुक लढविण्याची तयारी सुरू केली असून, राज्यातील सहा मतदारसंघावर त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. यामध्ये विदर्भातील वर्धा व बुलडाणा या दोन मतदारसंघाचा समावेश आहे. स्वाभिमानीचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजु शेटटी यांनी पुण्यात एका कार्यक्रमामध्ये ही घोषणा केल्यानंतर संघटना पातळीवर मार्चेबांधणी सुरू झाली आहे.
गेल्याच महिन्यात पुकारलेल्या दूध आंदोलनाची यशस्वी सांगता झाल्यावर आता स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. राज्यातील वर्धा, बुलडाणा, हातकंणगले, कोल्हापूर, म्हाडा, सांगली या लोकसभा मतदारसंघावर स्वाभिमानीने लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपा-शिवसेनेसोबत महायुतीमध्ये सहभागी झाली होती. भाजपा-सेनेची सत्ता आल्यावर स्वाभिमानीला सदाभाऊ खोत यांच्या रूपाने विधानपरिषदेची एक जागा व मंत्रीमंडळात स्थान तसेच रविकांत तुपकर यांना महामंडळ देऊन सत्तेत वाटाही मिळाला मात्र शेतकऱ्यांप्रश्नावर हे सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारच्या विरोधात थेट रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले. दरम्यानच्या काळात कृषी राज्यमंत्री झालेले सदाभाऊ खोत व खासदार शेटटी यांचे संबध ताणल्यागेल्यामुळे सदभाऊंची पक्षातुन हकालपटटी केली. तुपकरांनी महामंडळाचा राजीनामा दिला व स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीमधून बाहेर पडली. सत्तेतुन बाहरे पडताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाची तिव्रता वाढविली. गेल्याच महिन्यात झालेल्या दूध आंदोलनामुळे शेतकºयांना जादा भाव मिळवून देण्यात यशस्वी झाले असल्याने संघटनेच्या कार्यकर्त्यांचा विश्वास दूणावला असल्याने आता लोकसभेची तयारी सुरू केली आहे.
बुलडाण्यात स्वाभिमानीच्या वतिने प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांना तर वर्धेत माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांना उमेदवारी दिली जाणार आहे. बुलडाण्यात विविध आंदोलनाच्या माध्यमातुन तुपकरांनी स्वाभिमानीचे जाळे मजबुत केले असले,तरी त्यांचा सामना हा शिवसेना व राष्टÑवादी या दोन पक्षांशी आहे. तुपकरांना ऐनवेळी म्हाडा मतदारसंघातही उमेदवारी देण्याचीही शक्यता आहे. गेल्या वेळी स्वाभिमानीने म्हाडामधून चांगलीच टक्कर दिली होती. माजी खासदार मोहीते यांनी शिवसेना, काँग्रेस,शिवसंग्राम असा प्रवेश करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला असल्याने त्यांच्या वलयाचा पक्षाला फायदा होईल असा स्वाभिमानीचा होरा आहे. वर्धामतदारसंघात समाविष्ट असलेल्या अमरावती जिल्ह्याच्या दोन विधानसभा मतदारसंघात स्वाभिमानीने चांगली बांधणी केली आहे. उर्वरित वर्धा मतदारसंघात स्वाभिमानीला नव्यानेच समिकरण मांडावे लागणार आहे.


अन्यथा स्वबळावर लढणार
लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस आघाडीमध्ये सहभागी होऊ शकते. शिवसेना सत्तेतुन बाहेर पडली व स्वबळावर लढली तर सेनेसोबत जाण्याचा पर्याय स्वाभिमानीने खुला ठेवला आहे. लोकसभेच्या सहा जागांवर तयारी सुरू केली असली तरी किमान चार जागा शिवाय तडजोड केली जाणार नसल्याची माहिती सुत्रांनी दिली.कुठल्याही पक्षासोबत आघाडी न झाल्या स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा असे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत.

आघाडी किंवा युती बाबत खासदार शेटटी यांची भूमिका स्पष्ट आहे. भाजपासोबत कुठल्याही परिस्थितीत निवडणुक लढविली जाणार नाही त्यामुळे इतर पक्षांचा पर्याय खुला आहे. आम्ही सहा मतदारसंघात स्वबळावरच तयारीला लागलो आहोत
-रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी पक्ष.

 

Web Title: 'Swabhimani' will contest two Lok Sabha constituency in vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.