स्वानंद सावरकर व सचिन दीक्षितने राखले ज्युदोत वर्चस्व
By admin | Published: August 13, 2015 01:10 AM2015-08-13T01:10:04+5:302015-08-13T01:10:04+5:30
अकोला जिल्हास्तरीय शालेय ज्युदो स्पर्धा.
अकोला: वसंत देसाई क्रीडांगण येथे आयोजित जिल्हास्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेत १९ वर्षाआतील मुलांच्या गटात स्वानंद सावरकर आणि सचिन दीक्षित यांनी शानदार खेळप्रदर्शन करीत प्रतिस्पर्धीवर विजय मिळविला. सचिन याने मनपा क्षेत्रामध्ये तर स्वानंद सावरकर याने ग्रामीण क्षेत्रामध्ये वर्चस्व सिद्ध केले. मंगळवारी झालेल्या या स्पर्धेत मनपाक्षेत्र १७ वर्षाआतील मुलांच्या गटात ४0 किलो वजन गटामध्ये तुशीत दामोदर, ४५ किलो अमोल डांबरे, ५0 किलो सुमेध इंगळे, ५५ किलो गौरव नागे, ६0 किलो प्रेम सोनी, ७१ किलो वजन गटात श्रेयश वक्ते यांनी प्रथम स्थान पटकाविले. मुलींच्या गटात ३६ किलो वजन गटात निशा थोरात, ४0 किलो ममता धावडे, ४४ किलो तेजस्विनी काळे, ४८ किलो कुमुद पोहूरकर, ५२ किलो वजन गटात वैष्णवी बाहकर अव्वल ठरली. १९ वर्षाआतील मुलांच्या गटात ४0 किलो सचिन गवळी, ४५ किलो मंदार सोनोने, ५0 किलो सिद्धार्थ कोहचडे, ५५ किलो कृष्णा मलिये, ६५ किलो वजन गटात सचिन दीक्षित याने विजय मिळविला. मुलींच्या गटामध्ये ४४ किलो वजन गटात संध्या इखार, ५२ किलो गटात उत्कर्षा जांभळे, ६१ किलोच्या वर वजन गटात वैष्णवी निखोरे यांनी जेतेपद मिळविले. ग्रामीण क्षेत्रामध्ये १७ वर्षाआतील गटात ४0 किलो वजन गटात रोशन राठोड, ४५ किलो प्रवीण सुळकर, ५0 किलो अजय राठोड, ५५ किलो प्रणय राठोड, ६0 किलो अंकुश कर्हाडे, ६५ किलो आदेश गेंढ, ७१ किलो मितलेश धारपवार, ७१ किलोवरील वजन गटात सुयश गायगोळ यांनी प्रथम स्थान पटकाविले. १९ वर्षाआतील वजन गटात ४0 किलो अजय शित्रे, ४५ किलो सुनील मेघने, ५0 किलो अभिषेक तिवारी, ५५ किलो देवाशिष बागडे, ६0 किलो अर्जुन राठोड, ६५ किलो रवींद्रसिंग पवार, ७१ किलो सुजीत तेलगोटे, ७१ किलोवर वजनगटात स्वानंद सावरकर यांनी विजय मिळवून विभागीय स्तर स्पर्धेसाठी प्रवेश निश्चित केला.