शहरावर स्वाइन फ्लू, डेंग्यूचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 02:23 AM2017-10-10T02:23:17+5:302017-10-10T02:23:36+5:30
अकोला : ढगाळ हवामान, अधूनमधून पडणारा पाऊस, तापमानात होणारा बदल आणि त्यात भरीस भर शहराच्या कानाकोपर्यात साचलेली घाण यामुळे शहरात साथ रोगांचा उद्रेक झाला आहे. खासगी रुग्णालयात दाखल झालेले स्वाइन फ्लू व डेंग्यूसदृश आजारांचे रुग्ण पाहता अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात असल्याचे चित्र दिसून येत आहे. अकोलेकरांच्या आरोग्याची जबाबदारी असणार्या मनपाच्या वैद्यकीय आरोग्य विभाग व मलेरिया विभागाकडून नेमक्या कोणत्या उपाययोजना राबवल्या जात आहेत, यावर प्रशासनानेच अंतर्मुख होण्याची वेळ आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : ढगाळ हवामान, अधूनमधून पडणारा पाऊस, तापमानात होणारा बदल आणि त्यात भरीस भर शहराच्या कानाकोपर्यात साचलेली घाण यामुळे शहरात साथ रोगांचा उद्रेक झाला आहे. खासगी रुग्णालयात दाखल झालेले स्वाइन फ्लू व डेंग्यूसदृश आजारांचे रुग्ण पाहता अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात असल्याचे चित्र दिसून येत आहे. अकोलेकरांच्या आरोग्याची जबाबदारी असणार्या मनपाच्या वैद्यकीय आरोग्य विभाग व मलेरिया विभागाकडून नेमक्या कोणत्या उपाययोजना राबवल्या जात आहेत, यावर प्रशासनानेच अंतर्मुख होण्याची वेळ आली आहे.
दिवसभर कडाक्याचे तापणारे ऊन, त्यामुळे निर्माण होणारा उकाडा आणि सायंकाळ होताच थंडी अशा बदलामुळे शहरात ‘व्हायरल फिवर’ची साथ पसरली आहे. शहरात राबवल्या जाणार्या ‘स्वच्छता मोहिमे’चा आधार घेत सर्वत्र साफसफाईची कामे चोखपणे होत असल्याचा दावा महापालिका करीत आहे. परिस्थिती नेमकी उलटी आहे. मागील २0 दिवसांपासून शहरात नित्यनेमाने साफसफाई होत आहे. तरीसुद्धा साचलेली घाण व केरकचरा पाहता हा कचरा नेमका येतो कुठून, असा सवाल उपस्थित होतो.
या सर्वांचा परिणाम अकोलेकरांच्या आरोग्यावर झाला असून, साथ रोगांमुळे शहरातील खासगी रुग्णालये रुग्णांमुळे ‘हाऊसफुल’ असल्याचे दिसत आहे. सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, घसा खवखवणे तसेच विषाणूजन्य रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यातही लहान मुले,वयोवृद्ध नागरिकांच्या आजारी पडण्याचे प्रमाण मोठे आहे. काही खासगी रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लू व डेंग्यूसदृश आजारांचे रुग्ण दाखल झाले आहेत.
यातील डेंग्यूच्या रुग्णांचे रक्ताचे नमुने ‘पॉझिटिव्ह’आढळले आहेत. वातावरणातील बदल अशा जीवघेण्या आजारांसाठी पोषक ठरतात.
स्लम एरियात सर्वाधिक रुग्ण
शहरातील स्लम आणि झोपडपट्टी भागात साफसफाईच्या कामांचा बोजवारा उडाला असून, आरोग्य निरीक्षकांसह सफाई कर्मचार्यांना काहीही घेणे-देणे नसल्याचे दिसून येते. परिणामी या भागात संसर्गजन्य आजारांचा उद्रेक झाला असून, प्रत्येक घरातील एक रुग्ण तापाने फणफणत असल्याचे चित्र आहे. अशा भागात मनपाच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेने व मलेरिया विभागाने तातडीने उपाययोजना राबवणे अपेक्षित असताना दोन्ही यंत्रणांचा कारभार कागदोपत्री सुरू असल्याची विदारक परिस्थिती आहे.
आयुक्त साहेब, याकडे लक्ष द्याल का?
अकोलेकरांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या मनपाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकार्यांच्या वेतनावर वार्षिक कोट्यवधींचा खर्च होत असला तरी या विभागाचा कारभार कागदोपत्री सुरू आहे. किसनबाई भरतीया व कस्तुरबा गांधी रुग्णालयात कार्यरत संबंधित अधिकारी, कर्मचार्यांच्या कामकाजाचे कोणतेही मूल्यमापन किंवा आकस्मिक तपासणी होत नसल्यामुळे या विभागातील निर्ढावलेले बहुतांश अधिकारी-कर्मचारी कामावर हजर राहत नसल्याची माहिती आहे. या विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे आपसांत कमालीचे ‘ट्युनिंग’ आहे. लेखी स्वरूपात रजेचा अर्ज सादर न करता काही कर्मचारी कामावरून पळ काढत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारांकडे मनपा आयुक्त अजय लहाने लक्ष देतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.