स्वाईन फ्लूसदृश आजाराने विवाहितेचा मृत्यू, सेवाग्राम रुग्णालयात उपचारादरम्यान झाला मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 02:33 AM2017-09-06T02:33:11+5:302017-09-06T02:33:20+5:30
गोसावी नगरातील रहिवासी कविता अनिल उंदे (२४) या महिलेचा सेवाग्राम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिला स्वाईनफ्लूची लागण झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तविला आहे.
आकोली (वर्धा) : गोसावी नगरातील रहिवासी कविता अनिल उंदे (२४) या महिलेचा सेवाग्राम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिला स्वाईनफ्लूची लागण झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तविला आहे. कविताच्या मृत्यूने तिचे नऊ महिन्यांचे बाळ पोरके झाले आहे.
कविताला सर्दी, ताप व घशात खवखव होती त्यामुळे वर्धा येथील खासगी दवाखान्यात तिच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान तिची प्रकृती अधिक खालावल्याने नागपूर येथे हलविण्यात आले. मात्र उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने तिला सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल केले. दरम्यान मंगळवारी तिचा मृत्यू झाला. जिल्ह्यात स्वाईनफ्लूचे निदान करण्याची सुविधा नाही. डॉक्टरांना ृरुग्णाच्या दिसणाºया लक्षणांवरच उपचार केंद्रीत करावा लागतो. वृत्त लिहेपर्यंत आरोग्य विभागाकडे या घटनेची नोंद नव्हती.