दुधाळा येथे स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळला!
By admin | Published: May 20, 2017 01:52 AM2017-05-20T01:52:09+5:302017-05-20T01:52:09+5:30
हातरूण : दुधाळा येथील आठ वर्षीय बालकाला स्वाइन फ्लूची लागण झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. स्वाइन फ्लूची लागण बालकावर झाल्यावर त्याला सर्वोपचारमध्ये दाखल करण्यात आले आहे.
हातरूण : दुधाळा येथील आठ वर्षीय बालकाला स्वाइन फ्लूची लागण झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. स्वाइन फ्लूची लागण बालकावर झाल्यावर त्याला सर्वोपचारमध्ये दाखल करण्यात आले आहे.
अकोला तालुक्यातील दुधाळा या गावातील एका बालकाला आजारी असल्याने अकोला शहरातील खासगी दवाखान्यात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. बालकांमध्ये स्वाइन फ्लूची लक्षणे आढळली. त्याची तापसणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान, बालक राहत असलेल्या गावात आगर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण केले आहे. शहरात आलेला स्वाइन फ्लू आता ग्रामीण भागातही पोहोचला असून, आरोग्य विभागाने उपाययोजना करण्याची मागणी सोपान काळे, गोपाल कराळे, विजय चोरे, गणेश चोरे, राजेश काळे यांनी केली आहे.
सूर्य आग ओकत असल्याने तापमानाने मोठी वाढ झाली आहे. अशा तापमानातही स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. आगर प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी गावात सर्वेक्षण आणि तपासणीसाठी नियमित येत नसल्याचे यावरून दिसून येते.