सात सरपंचांवर कारवाईची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 03:40 PM2019-12-23T15:40:18+5:302019-12-23T15:40:23+5:30

अकोला जिल्ह्यातील ७ ग्रामपंचायतींच्या ८ प्रकरणांत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सुनावणी घेतली आहे.

Sword of action on seven sarpanchs |  सात सरपंचांवर कारवाईची टांगती तलवार

 सात सरपंचांवर कारवाईची टांगती तलवार

Next

अकोला : ग्रामपंचायतचे कामकाज करताना सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी कर्तव्यात कसूर करणे, गैरवर्तन केल्याने अपात्रतेच्या कारवाईसाठी विभागीय आयुक्तांकडे दाखल ८ ग्रामपंचायतींच्या प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून चौकशी अहवाल मागविण्यात आला. त्यासाठी सुनावणी घेण्यात आली आहे. सर्वच ग्रामपंचायतींच्या संबंधितांना बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. त्यामुळे आता संबंधितांमध्ये कारवाईची धाकधूक निर्माण झाली आहे.
ग्रामपंचायतींमध्ये निवडून आलेले सरपंच, उपसरपंच, सदस्य, सचिवांनी कामकाज करताना गैरवर्तणूक करणे, कायद्याने ठरवून दिलेल्या जबाबदाºया पूर्ण करण्यात कुचराई करणे, कर्तव्यात कसूर करणे, यासारख्या प्रकरणात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ३९(१) नुसार संबंधित सरपंच, उपसरपंच, सदस्यांवर अपात्रेची कारवाई केली जाते. त्यासाठी प्रकरण विभागीय आयुक्तांकडे दाखल केले जाते. अर्धन्यायिक पद्धतीने कामकाज चालणाºया या प्रकरणांचा चौकशी अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून घेतला जातो. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतंत्रपणे चौकशी करून अहवाल सादर करतात. अकोला जिल्ह्यातील ७ ग्रामपंचायतींच्या ८ प्रकरणांत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सुनावणी घेतली आहे. अर्जदार, गैरअर्जदार दोन्ही पक्षांना बाजू मांडण्याची संधी देत अहवाल तयार केला आहे. त्या अहवालानुसार आता पुढील सुनावणी विभागीय आयुक्तांकडे होणार आहे. आयुक्तांकडे या प्रकरणात पुढील कारवाईचा आदेश दिला जातो.
-सात ग्रामपंचायतींची आठ प्रकरणे
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, सचिवांनी कर्तव्यात कसूर केल्याची सात गावांतील प्रकरणे आहेत. त्यामध्ये अकोट तालुक्यातील वडाळी सटवाई -२, पळसोद, तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड रूपराव, पाथर्डी, बार्शीटाकळी तालुक्यातील कासारखेड, मूर्तिजापूर तालुक्यातील गोरेगाव(पूंम), सिरसो या ग्रामपंचायतच्या सरपंच, सचिव व सदस्यांचा समावेश आहे.


 नियमांचा भंग, अतिक्रमण, शिवीगाळ
पदावरून अपात्र ठरविण्यासाठी दाखल केलेल्या ८ प्रकरणांत संबंधित सरपंच, उपसरपंच, सदस्य, सचिवांवर प्रामुख्याने ग्रामपंचायत अधिनियमातील नियमांचा भंग करणे, गावातील अतिक्रमणाला प्रोत्साहन देणे, सभेत शिवीगाळ करणे, अधिनियमात ठरवून दिलेले कर्तव्य पार पाडण्यात कसूर करणे, यासारख्या कारणांचा समावेश आहे.


सात सरपंचांविरोधात तक्रारी
वडाळी सटवाईचे सरपंच प्रभाकर नथ्थुजी वानखडे, तर वानखडे यांनी इतर सहा सदस्यांविरुद्ध तक्रार केली आहे. पाथर्डीचे सरपंच गजेंद्र वसो, सिरसो-जयश्री सुरेंद्र मेहरे, कासारखेड-हिरासिंग रामू राठोड, गोरेगाव (पूंम)- ताई सुनील सरदार, हिवरखेड- अरुणा सुरेश ओंकारे, पळसोद-शारदा ज्ञानेश्वर आढे यांच्याविरुद्ध तक्रारी करण्यात आल्या आहेत.

 

Web Title: Sword of action on seven sarpanchs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.