प्रतीकात्मक पुतळा जाळला; १४ जणांना अटक व सुटका
By admin | Published: March 9, 2017 03:26 AM2017-03-09T03:26:50+5:302017-03-09T03:26:50+5:30
फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी.
तेल्हारा, दि. ८- शहरातील टॉवर चौकात ६ मार्च रोजी फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याबद्दल संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल करा, या मागणीसाठी काही युवकांनी पोलीस प्रशासनाचा प्रतीकात्मक पुतळा जाळला होता. त्याप्रकरणी पोलिसांनी ७ व ८ मार्च रोजी एकूण १४ आरोपींना अटक केली व नंतर सुटका झाली.
जिल्ह्यामध्ये दहावी व बारावीची परीक्षा असल्याने जिल्हाधिकारी यांनी जमावबंदी आदेश जारी केलेला आहे. तरीदेखील आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणार्यावर गुन्हे दाखल करा, यासाठी तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये काही युवकांनी आग्रह धरला. तेथून टॉवर चौकात येऊन पुतळा जाळला. काही काळ शहरात तणावपूर्ण वातावरण झाल्याने अतिरिक्त पोलीस बोलविण्यात आले.
या प्रकरणातील आरोपी विलास मधुकर पवार, अशोक बळीराम दारोकार, धीरज रमेश वरठे, कमलकिशोर भोजने, नारायण पोहोरकार, विनोद पोहोरकार, दिलीप हिवराळे, उमेश दामले, विलास पोहोरकार, शे. मोहसीन शे. गफुर, रोशन दामोदर, अमीत दामोदर, संघपाल भोजने, आकाश सरदार यांना अटक करून नंतर सुटका करण्यात आली. पुढील तपास ठाणेदार नंदकिशोर नागलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करुणा आतराम करीत आहेत.