अकोल्यात मुख्य अभियंता राहिलेले ताकसांडे महावितरणच्या संचालक पदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:17 AM2021-03-21T04:17:39+5:302021-03-21T04:17:39+5:30

वीजक्षेत्रातील महत्त्वाच्या पदांवर सुमारे ३१ वर्षांचा अनुभव असलेले संजय ताकसांडे हे सन २००३ मध्ये सध्याच्या महावितरण व तत्कालीन महाराष्ट्र ...

Takasande, who remains the Chief Engineer in Akola, is the Director of MSEDCL | अकोल्यात मुख्य अभियंता राहिलेले ताकसांडे महावितरणच्या संचालक पदावर

अकोल्यात मुख्य अभियंता राहिलेले ताकसांडे महावितरणच्या संचालक पदावर

Next

वीजक्षेत्रातील महत्त्वाच्या पदांवर सुमारे ३१ वर्षांचा अनुभव असलेले संजय ताकसांडे हे सन २००३ मध्ये सध्याच्या महावितरण व तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये कार्यकारी अभियंता म्हणून मुंबई मुख्यालयात रुजू झाले. त्यानंतर ते अधीक्षक अभियंता पदावर वसई, बुलडाणा व मुख्य अभियंता म्हणून अमरावती परिमंडळ, अकोला या ठिकाणी कार्यरत होते. ऑक्टोबर २०१५ मध्ये थेट भरती प्रक्रियेतून ताकसांडे यांची मुंबई, मुख्यालयात कार्यकारी संचालक (वितरण) पदी निवड झाली व वितरण, भारव्यवस्थापन, सामग्री व्यवस्थापन व वितरण फ्रेंचाईझी या विभागांसह पश्चिम महाराष्ट्रासोबतच विदर्भ विभागाचे नियंत्रणही त्यांच्याकडे होते. ऑक्टोबर-२०१६ मध्ये प्रादेशिक कार्यालय अस्तित्वात आल्यानंतर त्यांची प्रादेशिक संचालक, पुणे येथे नियुक्ती झाली. एप्रिल २०१९ मध्ये संजय ताकसांडे यांची महापारेषण कंपनीच्या संचालक (संचालन) पदी थेट भरती प्रक्रियेद्वारे निवड झाली व आतापर्यंत या पदावर ते कार्यरत होते. महावितरण व महापारेषणच्या सेवेत येण्यापूर्वी संजय ताकसांडे हे केंद्र शासनाच्या केंद्रीय विद्युत प्राधिकरण, नवी दिल्ली येथे तसेच पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई या ठिकाणी कार्यरत होते.

Web Title: Takasande, who remains the Chief Engineer in Akola, is the Director of MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.