दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी दोषींवर कारवाइ करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:19 AM2021-03-31T04:19:24+5:302021-03-31T04:19:24+5:30
अकोला : अमरावती जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्पाच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी शासकीय निवासस्थानी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. ...
अकोला : अमरावती जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्पाच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी शासकीय निवासस्थानी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन महिला आघाडी अकोला जिल्हा शाखेच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार यांच्या आर्थिक व मानसिक जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे ‘सुसाइड नोट’मध्ये नमूद करण्यात आले. त्या अनुषंगाने शिवकुमार यांना ताब्यात घेण्यात आले आहे; परंतु या प्रकरणात क्षेत्र संचालक रेड्डी यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोपही ‘सुसाइड नोट’मध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन महिला आघाडीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, वंदना वासनिक, पुष्पा इंगळे, प्रमोद देंडवे, सचिन शिराळे, मंदा वाकोडे, मंगला शिरसाट, मंदा शिरसाट, सुवर्णा जाधव, कविता राठोड, संगीता खंडारे, सचिन शिरसाट, गजानन गवइ, प्रतिभा नागदेवते, शितल सोनोने, गंगाधर सावळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
.................फोटो.............