जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

By रवी दामोदर | Published: June 20, 2023 05:00 PM2023-06-20T17:00:40+5:302023-06-20T17:00:48+5:30

जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची बैठक

Take action against illegal passenger transporters in the akola district; Instructions of Collector | जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

googlenewsNext

अकोला : वाहतुकीचा परवाना नसतानाही शहरासह जिल्ह्यात अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करून कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी मंगळवारी जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी प्रामुख्याने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीष शास्त्री, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे श्रीकांत ढगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील, सविता नागवंशी, रुपेश दरोकार, मनपाचे उपअभियंता युसूफ खान, डॉ. निशांत रोकडे तसेच विविध विभागांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील रस्ते वाहतूक सुरळीत व अपघातविरहित करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करताना मार्गदर्शक फलक, सूचना, चिन्हे योग्य ठिकाणी लावून आवश्यक त्या उपाययोजनांची कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच उपाययोजनांसंदर्भात कार्यवाहीचा आढावा यावेळी घेण्यात आला. त्यामध्ये अकोला शहरात वाहनतळांसंदर्भात उपाययोजनांची माहिती घेत, यासंदर्भातील कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.

शहरात लोकसंख्येच्या तुलनेत ऑटोरिक्षांच्या संख्येचे प्रमाण लक्षात घेता, विनापरवाना चालणाऱ्या ऑटोरिक्षांची तपासणी करून कारवाई करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. काही जास्त प्रवासी कोंबून, तर काही प्रवासी वाहतुकीचा परवाना नसताना शहरात प्रवासी वाहतूक करीत असतात. अशा सर्व वाहनांची तपासणी करून कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. यासोबतच अकोला शहरातील जड वाहनांच्या प्रवेश मनाईच्या वेळेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.

Web Title: Take action against illegal passenger transporters in the akola district; Instructions of Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला