रेती, गिट्टीची अवैध वाहतूक करणा-यांवर कारवाईचा बडगा
By admin | Published: November 10, 2014 01:16 AM2014-11-10T01:16:50+5:302014-11-10T01:16:50+5:30
मुर्तिजापूरात कारवाई, १ लाख ९३ हजार २00 रुपयांचा दंड वसूल.
मूर्तिजापूर (अकोला): तालुक्यातील अनभोरा येथून विनारॉयल्टी रेती व गिट्टीची वाहतूक करणार्या सात ट्रकमालकांवर तहसीलदार गजेंद्र मालठाणे यांच्या पथकाने रविवार, ९ नोव्हेंबर रोजी कारवाई करून १ लाख ९३ हजार २00 रुपयांचा दंड वसूल केला. अनभोरा येथून अवैधरीत्या रेती व गिट्टीची वाहतूक केल्या जात असल्याची गुप्त माहिती तहसीलदार मालठाणे यांना मिळाली होती. त्यानुसार तहसीलदार मालठाणे यांच्या पथकाने रविवारी सकाळी राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर पंजाबी ढाब्यासमोर सापळा रचला. यावेळी रेती व गिट्टीची वाहतूक करणारे सात ट्रक पकडून त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही केली. या वाहनांमध्ये एकूण २१ ब्रॉस रेती व गिट्टी होती. यावेळी तहसीलदारांच्या पथकाने सै. मुख्तार सै. सुभान, अविनाश कोकाटे, संजय विठ्ठलराव तायडे, शे. शकील शे. अब्दुल, किरददास देवदास खत्री, विपुल खंडेलवाल, दिनेश दुबे या ट्रकमालकांकडून एकूण १ लाख ९३ हजार २00 रुपयांचा दंड वसूल केला.