बियाणे-खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर धडक कारवाई करा - पालकमंत्र्यांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 01:26 PM2019-06-16T13:26:38+5:302019-06-16T13:26:54+5:30
अकोला : बोगस बियाणे व खतांसंदर्भात तक्रारींवर तातडीने कारवाई करण्याचे सांगत, विशेष तपासणी पथके तयार करून बियाणे-खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शनिवारी दिले.
अकोला : बोगस बियाणे व खतांसंदर्भात तक्रारींवर तातडीने कारवाई करण्याचे सांगत, विशेष तपासणी पथके तयार करून बियाणे-खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शनिवारी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित जिल्ह्यातील दुष्काळ व पाणीटंचाई निवारणासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते. खरीप हंगामाच्या पृष्ठभूमीवर येणारे काही महिने शेतकºयांच्या दृष्टीने महत्त्वाचे असून, पीक कर्ज, बियाणे, खते व कीटकनाशके आणि इतर प्रकारच्या कामात शेतकºयांना येणाºया अडचणी सोडविण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कामे करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. खरीप पेरणीसाठी शेतकºयांना आवश्यक असलेले बियाणे, खते व कीटकनाशकांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याचे सांगत, बोगस बियाणे व खतांसंदर्भात तक्रारींवर तातडीने कारवाई करावी, त्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या मार्गदर्शनात विशेष तपासणी पथके गठित करून बियाणे व खतांचा काळाबाजार करणाºयांवर धडक कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले. जिल्ह्यातील दुष्काळ व पाणीटंचाई निवारणासाठी राबविण्यात येणाºया उपाययोजना, बियाणे-खतांची उपलब्धता, कृषी पंप जोडण्या, पीक कर्जाचे वाटप, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांची कामे, रस्त्यांची कामे आणि कायदा व सुव्यवस्थेचा आढावा यावेळी पालकमंत्र्यांनी घेतला. या बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण वाघमारे, उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
शेतकºयांना तातडीने पीक कर्जाचे वाटप करा!
पीक कर्जासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांना बँकांनी तातडीने पीक कर्जाचे वाटप करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. शेतकºयांच्या अडचणी सोडवून त्यांना सहकार्य करण्याच्या सूचना देत, जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकºयांसाठी प्राप्त झालेली १३७ कोटी रुपयांची दुष्काळी मदत दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
अकोला शहराला ४० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध!
जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार अकोला शहराला ४० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा महान येथील काटेपूर्णा धरणात उपलब्ध आहे. तसेच पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात ४०० दिवस पुरेल एवढा चारासाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना ४१ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.
२५०० घरकुलांना वीज जोडणी उपलब्ध करा!
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात नवीन तयार झालेल्या २५०० घरकुलांना दीनदयाल उपाध्याय उजाला योजनेंतर्गत वीज जोडणी उपलब्ध करून देण्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी महावितरण कंपनीला दिले, तसेच उज्ज्वला योजनेंर्गत गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.
नेकलेस रोडवरील विद्युत खांब हटवा!
अकोला शहरातील नेकलेस रोडवरील विद्युत खांब हटविण्याचे काम १५ दिवसांत पूर्ण करून, वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी वाहन पार्किंग व्यवस्था सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाला दिल्या. सांस्कृतिक भवनासाठी फर्निचर, विद्युतीकरण, आवारभिंत, स्वीमिंग पूल व इतर कामांसाठी १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
गौण खनिज अवैध वाहतुकीवर कारवाई करा!
गौण खनिज अवैध वाहतूक संदर्भात पोलीस विभागाने कोणत्याही दबावाखाली न येता कडक कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पोलीस विभागाला दिले. वाळूचे अवैध उत्खनन व अवैध वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी पोलीस विभागाने स्वतंत्र पथक तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.