सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:14 AM2021-07-20T04:14:30+5:302021-07-20T04:14:30+5:30
प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पालकमंत्री बच्चू कडू यांनी दोन दिवसांपूर्वी नाशिक येथील दिव्यांग मुलगी रसिका अडगावकर व ...
प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पालकमंत्री बच्चू कडू यांनी दोन दिवसांपूर्वी नाशिक येथील दिव्यांग मुलगी रसिका अडगावकर व असिफ खान यांच्या विवाह संबंधात त्यांच्या पालकांच्या सहमतीने संबंधित विवाहाला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर प्रत्यक्षात परिस्थिती जाणून न घेता दोन धर्मात वाद दर्शवून काही समाजकंंटकांनी सोशल मीडियावर पालकमंत्री बच्चू कडू यांच्याविरोधात शिवीगाळ तसेच धमक्या देऊन आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ टाकले. संबंधित पोस्ट व व्हिडिओ टाकणाऱ्यांवर सायबर क्राइमनुसार गुन्हे दाखल करून अटक करावी, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे तक्रारीत नमूद आहे. निवेदन देताना प्रहार सेवक सागर उकंडे, विशाल भगत, किशोर देशमुख, अचल बेलसरे, बजरंग मिसळे, आकाश निबोळकर, वैभव काळे, रितेश हाडोळे, ऋषी लिल्हारे, विजय लिल्हारे, प्रवीण चिंचोळकर, रॉकी वाघमारे आदी उपस्थित होते.