कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द कारवाइ करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:20 AM2021-02-16T04:20:28+5:302021-02-16T04:20:28+5:30
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला नियंत्रीत करण्यासाठी जिल्हाधिकारी पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणांची बैठक जिल्हाधिकारी यांच्या दालनात पार पडली. यावेळी ...
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला नियंत्रीत करण्यासाठी जिल्हाधिकारी पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणांची बैठक जिल्हाधिकारी यांच्या दालनात पार पडली. यावेळी मनपा आयुक्त निमा अरोरा, पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन, प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत विचारविनिमय करण्यात आला. मास्कचा वापर, व्यक्ति व्यक्तिंमधील परस्पर अंतर राखणे व सॅनिटायझरचा वापर आणि हात धुणे या बाबींचा अवलंब करणे आवश्यक आहे. असे असतांना शहरात व अन्यत्र सर्रासपणे लोक घोळके करुन उभे असतात. हॉटेल्स, चहा स्टॉल, कौटुंबिक सोहळे तसेच अन्य कार्यक्रमांच्या निमित्ताने होणाऱ्या गर्दीत नियमांचे पालन व्हावे. मर्यादित संख्येतच लोक एकत्र यावेत, दुकाने, विविध आस्थापनांमध्ये जिथे लोक एकत्र येतात तेथे या नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवृत्तींना आळा बसावा यासाठी महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था ( महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत ) यांचे संयुक्त पथके तैनात करुन कारवाई करण्यात यावी तसेच ज्या व्यावसायिक प्रतिष्ठानांवर नियमांचे उल्लंघन होतांना दिसून येईल तेथे दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बैठकीत दिले.
Com