महाराजा अग्रसेन टॉवरवर फलक लावल्यास कारवाई करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:26 AM2021-09-10T04:26:16+5:302021-09-10T04:26:16+5:30
शहराचे वैभव असणाऱ्या व सौंदर्यात भर टाकणाऱ्या महाराजा अग्रसेन टॉवरवर होर्डिंग्ज लावण्यास बंदी आहे. असे असताना देखील वेगवेगळ्या राजकीय ...
शहराचे वैभव असणाऱ्या व सौंदर्यात भर टाकणाऱ्या महाराजा अग्रसेन टॉवरवर होर्डिंग्ज लावण्यास बंदी आहे. असे असताना देखील वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे, सामाजिक संघटनांचे व इतर असे जाहिरात फलक नेहमीच लावण्यात येतात. त्यामुळे या ठिकाणी कुठलेही फलक लागणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी. तसेच फलक लावल्यास लावणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई व्हावी. टाॅवरलगत विविध व्यावसायिक नेहमी दुकाने थाटतात व त्याठिकाणी घाण करतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते, म्हणून या ठिकाणी दुकाने लावण्यास बंदी घालण्यात यावी. अग्रसेन जयंतीपूर्वी टाॅवरवरील लोखंडी ग्रीलची रंगरंगोटी करण्यात यावी व टाॅवरची नियमित सफाई करण्यात यावी. टाॅवरवर नवीन घड्याळ बसविण्यात यावे, आदी मागण्या निवेदनात नमूद आहेत.
यांनी दिले निवेदन
निवेदन देणाऱ्यांमध्ये महेंद्र गोयनका, योगेश भारुका, धर्मेश चौधरी, मनीष गोयनका, रवी गाडोदिया, निरव पाडिया, पुरण अग्रवाल, नानकचंद अग्रवाल, गोपाल पडिया, विनोद पडिया, धीरज पडिया, सागर पडिया, सुरेश अग्रवाल, रवी पाडिया, अनुराग अग्रवाल, विजय अग्रवाल, नितीन अग्रवाल, विनोद बजाज, शिवम अग्रवाल, बिपीन अग्रवाल, दीपक गाडोदिया, नीलेश अग्रवाल, आनंद पडिया, गोपाल अग्रवाल, गौतम अग्रवाल यांच्यासह अनेक समाजबांधवांचा समावेश आहे.