कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्या!
By admin | Published: December 19, 2014 01:44 AM2014-12-19T01:44:54+5:302014-12-19T01:44:54+5:30
ईएसआयसीच्या शाखा महाव्यवस्थापकांचे आवाहन; लोकमत कर्मचा-यांना ‘ईएसआयसी स्मार्ट कार्डा’चे वितरण.
अकोला : कर्मचारी राज्य विमा महामंडळाकडे (ईएसआयसी) नोंदणी असलेल्या कर्मचार्यांच्या आरोग्यावर होणार्या खर्चाला कोणतीही र्मयादा नाही. एका कर्मचार्याच्या आजारावर तर जवळपास १ कोटी ७३ लाख खर्च करण्यात आला. या योजनांचा लाभ घेण्यासाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या योजनांची विस्तृत माहिती करून घ्यावी, असे आवाहन ईएसआयसीचे शाखा महाव्यवस्थापक तथा सामाजिक सुरक्षा अधिकारी एस.एस. कुरेवार यांनी मंगळवारी एमआयडीसी परिसरातील लोकमत भवन येथे केले. ते लोकमत कर्मचार्यांना ह्यईएसआयसीच्या स्मार्ट कार्डाह्णच्या वितरणप्रसंगी बोलत होते. व्यासपीठावर लोकमतचे सहाय्यक महाव्यवस्थापक रमेश डेडवाल, निवासी संपादक रवी टाले, लोकमत समाचारचे संपादकीय प्रभारी अरुण कुमार प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकमतचे संस्थापक संपादक तथा स्वातंत्र्य सेनानी आदरणीय जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कुरेवार यांनी ईएसआयसीतर्फे नोंदणीकृत कर्मचार्यांना मिळणार्या विविध योजनांची माहिती दिली. तथा सुदृढ कर्मचार्यांमुळे कंपनीचे उत्पादन वाढते. त्यामुळे कंपनीने कर्मचार्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तात्पुरते आजार, दीर्घ अजारांवरील उपचारासाठीचा खर्चही दिला जातो. कर्मचार्याचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्याला किंवा पत्नीला ९0 टक्के वेतन देण्यात येते. अपंगत्व आल्यास अथवा आजारी पडल्यास ईएसआयसी त्याला ७0 टक्के वेतन देते. दीर्घ स्वरूपाचा आजार झाल्यास संबंधित कर्मचार्यास ७३0 दिवसांपर्यंत त्याला मदत करते. साध्या खोकल्यापासून ते किडनी ट्रान्सप्लांटसारख्या जटिल आजारावरील उपचारासाठी ईएसआयसी कर्मचार्यांना मदत करते. ईएसआयसी कर्मचारी व त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या आरोग्याची काळजी घेते. मात्र यासाठी कर्मचार्यांनी सतर्क राहणे, आवश्यक बाबींची पूर्तता करावी. कर्मचार्यांनी स्वत:च्या अधिकारांप्रती जागरूक राहावे, असेही कुरेवार म्हणाले. यावेळी ईएसआयसीचे कर्मचारी पिटर जेम्स, श्रीकांत कुटे उपस्थित होते. प्रास्ताविक आणि अभारप्रदर्शन लोकमतचे मानव व संसाधन विकास विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक रवींद्र येवतकर यांनी केले. याप्रसंगी निर्मिती विभागप्रमुख रवींद्र बावस्कर, सहाय्यक जाहिरात व्यवस्थापक संदीप दिवेकर, रिकव्हरी विभाग प्रमुख गंगाधर राऊत, ह्यरेसह्ण विभाग प्रमुख प्रकाश वानखडे, लेखा विभाग प्रमुख विनायक जोशी, इव्हेंट विभाग प्रमुख प्रशांत पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.