वेळेचा फायदा घेऊन शेतक-यांची लूट!

By admin | Published: February 15, 2016 02:36 AM2016-02-15T02:36:11+5:302016-02-15T02:36:11+5:30

बाजार समितीत दुपारपर्यंत मिळतात चांगले दर; नंतर कमी दरात खरेदी

Take advantage of time to loot the farmers! | वेळेचा फायदा घेऊन शेतक-यांची लूट!

वेळेचा फायदा घेऊन शेतक-यांची लूट!

Next

मनोज भिवगडे / अकोला: कृषिउत्पन्न बाजार समितीत शेतमालाची खरेदी करताना वेळेचा फायदा घेऊन दर पाडले जात असल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे शे तकर्‍यांना क्विंटलमागे २00 ते ३00 रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. यासंदर्भात काही शेतकर्‍यांनी बाजार समिती प्रशासनाकडे तक्रार केली असून, प्रशासनाने या त सोमवारपासून सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. अकोला जिल्ह्यात सात कृषिउत्पन्न बाजार समित्या आहेत. त्यापैकी अकोला, आकोट आणि मूर्तिजापूर बाजार समितीमध्ये खरेदी-विक्रीचे मोठय़ा प्रमाणावर व्यवहार चाल तात. त्यातही अकोला बाजार समिती ही जिल्ह्यातील सर्वांत मोठे शेतमाल खरेदी-विक्री केंद्र असल्याने येथे दररोज लाखो क्विंटल शेतमाल येतो. सध्या तूर व हरभर्‍याचा हंगाम सुरू आहे. व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांना त्यांच्या मालाचे चांगले दर मिळतील, अशी अपेक्षा असते. काही गरजू शेतकरी त्यांचा माल आहे त्या दरात विकून मोकळे हो तात. याचाच फायदा घेत व्यापार्‍यांनी बाजार समितीमध्ये शेतकर्‍यांची लूट चालविली आहे. दुपारपर्यंंत नाफेडसह मोठय़ा व्यापार्‍यांकडून शेतमाल खरेदी केला जातो. तोपर्यंत बाजार समितीमध्ये सर्व काही सुरळीत सुरू असते. शेतमालाला चांगला दर मिळाल्यामुळे शेतकरीही समाधानी असतो; मात्र नाफेडला खरेदी केलेला शेतमाल त्याच दिवशी माल गोदामात पोहोचवावा लागत असल्याने दुपारनंतर त्यांची खरेदी बंद होते तसेच मोठे व्यापारीही खरेदी बंद करतात. परिणामी शेतकर्‍यांना त्यांचा माल छोट्या व्यापार्‍यांना विकावा लागतो. याचा फायदा घेऊन व्यापारी क्विंटल मागे २00 ते ३00 रुपयांपर्यंंत दर कमी करीत असल्याचा प्रकार बाजार समितीत घडत आहे. त्यातून शेतकर्‍यांना हजारो रुपयांचा फटका बसतो. कमी माल असलेल्या शेतकर्‍यांना वाहतुकीचा खर्च परवडण्याजोगा नसल्याने त्यांना कमी दरातच शेत माल विकावा लागतो. व्यापार्‍यांकडून हे प्रकार दररोज होत असल्याने याबाबत शेतकर्‍यांनी कृषिउत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाकडेही तक्रार केली आहे. यावर आता प्रशासनाने काही उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Take advantage of time to loot the farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.