शिवसेनेचे संजय गावंडे यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:19 AM2021-04-20T04:19:49+5:302021-04-20T04:19:49+5:30
अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहसचिव विनोद कराळे यांच्या तक्रारीनुसार त्यांना मारहाण करून शासकीय कामात अडथळा ...
अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहसचिव विनोद कराळे यांच्या तक्रारीनुसार त्यांना मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणला. या तक्रारीनुसार संजय लक्ष्मणराव गावंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अटक केल्यानंतर गावंडे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, शिवसेनेच्यावतीने १९ एप्रिल रोजी दिलेल्या निवेदनात, माजी आमदार संजय गावंडे हे कृषी उत्पन्न बाजार समिती येथील कार्यालयामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन गेले. तेथे मुख्य सचिव हजर नव्हते. हजर असलेले सहसचिव विनोद कराळे मद्यधुंद अवस्थेत होते. गावंडे यांनी त्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत विचारणा केली. तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आणि माजी आमदार गावंडे यांच्याविरुद्ध खोटी तक्रार दिली. त्या तक्रारीची सखोल चौकशी करून खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे, अन्यथा शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे, तालुका प्रमुख श्याम गावंडे, शिवसेना शहर प्रमुख सुनील रंधे, राहुल कराळे, गोपाल कावरे, गणेश डावर, पिंटू पालेकर, शिवा गोटे, संजय गयधर, गणेश चंडालिया, श्रीकांत कांबे, मुकेश ठोकळ, दीपक रेखाते, नीलेश गौड, सुभाष सुरतने, विजय ढेपे, संजय रेळे, गोविंद चावरे, अरविंद ढोरे, मयूर मर्दाने, कमल वर्मा, देवा कायवाटे, निखिल ठाकूर, नीलेश पगारे यांनी दिला आहे.
फोटो: