अकोलेकरांनो आरोग्य सांभाळा; २० वर्षांनंतर ‘जुलै’ने वाढविला ‘ताप’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:13 AM2021-07-09T04:13:31+5:302021-07-09T04:13:31+5:30
असे मोडले ‘जुलै’चे रेकॉर्ड... २०११ ३७.७ २०१५ ...
असे मोडले ‘जुलै’चे रेकॉर्ड...
२०११ ३७.७
२०१५ ३८.०
२०१८ ३६.०
२०२१ ४०.०
सरासरी तापमानात सहा अंशांची वाढ
जिल्ह्यात जुलै महिना सर्वाधिक पावसाचा मानला जातो; मात्र गेल्या काही वर्षांपासून या धारणेत खंड पडत आहे. जुलै महिन्यात पाऊस दडी देत आहे.
यावर्षी जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून पावसाने दडी मारल्याने तापमानात वाढ झाली. ७ जुलै रोजी जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ही सरासरीपेक्षा सहा अंशाची वाढ होती.
या आठवड्यात दिलासा मिळणार
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. जिल्ह्याचे तापमान ४० अंशावर पोहोचले. मात्र ८ जुलैपासून जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे तापमानात गारवा जाणवत होता.
हवामान विभागानुसार या आठवड्यात पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
आरोग्य संभाळा
ऐन पावसाळ्यात उन्हाच्या झळा जाणवत होत्या. आता पुन्हा पावसाचे आगमन झाल्याने थंडावा जाणवत आहे. या बदलत्या वातावरणात नागरिकांनी आपले आरोग्य सांभाळण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले.
- हवामान तज्ज्ञ