जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी दक्षता घ्या! सरपंच, पोलीस पाटील व ग्रामसेवकांना जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

By रवी दामोदर | Published: April 6, 2024 06:35 PM2024-04-06T18:35:22+5:302024-04-06T18:36:11+5:30

सखी वन स्टॉप सेंटरच्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये त्यांनी विविध सूचना केल्या. बालविवाह प्रतिबंध अधिनियमानुसार ग्रामसेवक हे ग्रामीण भागासाठी बालविवाह प्रतिबंध अधिकारी असून, अंगणवाडी सेवीका सहायक म्हणून काम करतात.

Take care to prevent child marriage in the district District Collector's instruction to Sarpanch, Police Patil and gram Sevaks | जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी दक्षता घ्या! सरपंच, पोलीस पाटील व ग्रामसेवकांना जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी दक्षता घ्या! सरपंच, पोलीस पाटील व ग्रामसेवकांना जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

अकोला: जिल्हा बालविवाहमुक्त होण्यासाठी गावात बालविवाह होणार नाही याची खबरदारी ग्रामसेवक, सरपंच व पोलीस पाटील यांनी घ्यावी, अशा सुचना शनिवारी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिल्या आहेत.  

सखी वन स्टॉप सेंटरच्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये त्यांनी विविध सूचना केल्या. बालविवाह प्रतिबंध अधिनियमानुसार ग्रामसेवक हे ग्रामीण भागासाठी बालविवाह प्रतिबंध अधिकारी असून, अंगणवाडी सेवीका सहायक म्हणून काम करतात. शहरी भागासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी हे बाल विवाहप्रतिबंध अधिकारी आहेत. गावांमध्ये बालकांच्या संरक्षणासाठी ग्राम बाल संरक्षण समित्या गठित असून, ग्राम बाल संरक्षण समितीचे सरपंच अध्यक्ष असून पोलीस पाटील हे त्या समितीचे सदस्य आहेत. 

त्यामुळे गावात बालविवाह तसेच बालकांच्या संबंधित कोणत्याही अघटित घटना होणार नाही याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे. ग्रामसेवक, सरपंच व पोलीस पाटील यांची भूमिका ही अतिशय महत्वपूर्ण आहे. गुढीपाडवा सण दि.९ एप्रिल रोजी आहे. यादिवशी अनेक देवस्थानांच्या ठिकाणी यात्रा, उत्सव असतो. त्याचप्रमाणे, विवाह सोहळेसुध्दा आयोजित केले जातात. या दिवशी जिल्ह्यात कोठेही बाल विवाह होणार नाही याची दक्षता गावचे सरपंच पोलीस पाटील व ग्रामसेवक यांनी घेणे आवश्यक आहे.

...वाजंत्री व मंडपवाल्यांवरही होऊ शकते शिक्षा
बालविवाह झाल्यास  विवाह सोहळ्यातील मंडपवाले, वाजंत्री, सहभागी मंडळी, मंगल कार्यालयमालक, वर व वधूचे आई वडील यांना शिक्षा होऊ शकते. तसेच ग्रामसेवक, सरपंच व पोलीस पाटील यांच्यावरही कार्यवाही प्रस्तावित केली जाऊ शकते. त्यामुळे तसे घडू नये याची दक्षता घ्यावी, अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.
 

Web Title: Take care to prevent child marriage in the district District Collector's instruction to Sarpanch, Police Patil and gram Sevaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.