विमानतळासाठी जागेचा दोन महिन्यात ताबा
By admin | Published: March 11, 2016 03:00 AM2016-03-11T03:00:40+5:302016-03-11T03:00:40+5:30
शिवनी विमानतळासाठी १५७ एकर जागेचा दोन महिन्यांत ताब्या देणार असल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू रविप्रकाश दाणी यांनी स्पष्ट केले.
अकोला : विमानतळासाठी १५७ एकर जागेचा दोन महिन्यांत ताब्या देणार असल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू रविप्रकाश दाणी यांनी स्पष्ट केले. आमदार गोपीकिसन बाजोरिया यांनी बुधवारी विमानतळासाठी लागणार्या जागेच्या मुद्यावर पीडकेव्हीच्या कुलगुरूंसोबत सविस्तर चर्चा केली.
तत्कालीन काँग्रेस आघाडीच्या कार्यकाळात विमानतळासाठी पीडीकेव्ही प्रशासनाने अतिरिक्त जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार गोपीकिसन बाजोरिया यांनी लावून धरली होती. या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन राज्यमंत्री फौजीया खान यांनी अनुकूलता दर्शवित जागा हस्तांतरित करण्याला मंजुरी दिली होती. त्यानंतर महसूल विभागाने जागेची मोजणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सद्यस्थितीत या जागेचा सातबारा शासनाच्या नावे करण्यात आल्याची माहिती आहे. तूर्तास जागेचा ताबा घेण्याची प्रक्रिया रखडली असून, या विषयावर आमदार गोपीकिसन बाजोरिया यांनी पीडीकेव्हीचे कुलगुरू रविप्रकाश दाणी यांची भेट घेतली. येत्या दोन महिन्यांत जागेचा ताबा देण्यात येईल, असे कुलगुरू दाणी यांनी बोलताना सांगितले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, निवासी उपजिल्हाप्रमुख राजेश मिश्रा, संतोष अनासने, जि.प. सदस्य चंद्रशेखर पांडे, तरुण बगेरे आदी उपस्थित होते.