ग्रामीण भाग काेराेनामुक्त करण्यासाठी पुढाकार घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:15 AM2021-05-28T04:15:15+5:302021-05-28T04:15:15+5:30

अकोला : आपण ज्या भागात आपली सेवा देता त्या भागाला, गावाला कोरोनामुक्त करणे हे आपले कर्तव्य असून, त्यासाठी आपण ...

Take the initiative to free rural areas | ग्रामीण भाग काेराेनामुक्त करण्यासाठी पुढाकार घ्या

ग्रामीण भाग काेराेनामुक्त करण्यासाठी पुढाकार घ्या

Next

अकोला : आपण ज्या भागात आपली सेवा देता त्या भागाला, गावाला कोरोनामुक्त करणे हे आपले कर्तव्य असून, त्यासाठी आपण प्रशासनाला सहकार्य करावे. आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना प्रारंभिक अवस्थेतच चाचणीसाठी प्रवृत्त करावे. पेशंटचा अहवाल कोविड निगेटिव्ह असल्यास त्यावर पुढील उपचार करावे अन्यथा त्यास शासकीय यंत्रणेच्या दवाखान्यात पाठवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता फैलाव तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका व म्युकरमायकोसिस या आजाराची वाढत असलेली रुग्णसंख्या याबाबत आज जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्णसेवा देणाऱ्या खासगी जनरल फिजिशियन डॉक्टर्सशी जिल्हा प्रशासनाने ऑनलाइन पद्धतीने संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटियार, जिल्हा शल्य चिकित्सक तथा उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले तसेच सर्व तालुक्यातील डॉक्टर्स ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले होते.

दिवसभरात मूर्तिजापूर, बाळापूर, अकोट, तेल्हारा, पातूर, बार्शी टाकळी व अकोला या तालुक्यातील डॉक्टर्सशी संवाद साधण्यात आला. यावेळी डॉ. राजकुमार चव्हाण तसेच डॉ. सुरेश आसोले यांनी डॉक्टर्सना कोविडसंदर्भात वापरावयाची उपचारपद्धती व उपचार अनुक्रमता याबाबत मार्गदर्शन केले.

जिल्हाधिकारी म्हणाले की, आपल्याकडे येणाऱ्या कोविड संशयित रुग्णांची एक यादीही आपण स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे अथवा आरोग्य यंत्रणेकडे देऊ शकता. त्या व्यक्तींचा स्थानिक पातळीवर पाठपुरावा करता येईल. या लवकर चाचणी व लवकर उपचार या पद्धतीचा अवलंब हा केवळ संसर्ग रोखण्यासाठी आहे.

ग्रामीण भागात आता बरेच लोक जे कोविडचे उपचार घेऊन बरे होऊन परत गेले आहेत अशा लोकांवरही आपण स्थानिक पातळीवर म्युकरमायकोसिसच्या संसर्गाबाबत लक्ष ठेवावे, त्यांना याबाबत समजावून सांगावे. त्यासोबतच तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका व त्यात लहान बालकांना होणाऱ्या संसर्गाचा धोका वर्तवण्यात आल्याने बालकांच्या आरोग्याकडेही आपण लक्ष द्यावे, त्यांच्या तपासण्या व लक्षणांतील बदल प्रशासनास तात्काळ कळवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

Web Title: Take the initiative to free rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.