‘मृत्युदर कमी करण्यासाठी उपाययोजना करा!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 10:49 AM2020-07-05T10:49:44+5:302020-07-05T10:50:13+5:30
उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला (जीएमसी) दिले.
अकोला : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्युदर कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला (जीएमसी) दिले.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्युदर वाढतच आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी पापळकर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार पद्धतीचा आढावा घेत, कोरोनाबाधित रुग्णांचा वाढता मृत्युदर कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी ‘जीएमसी’ प्रशासनाला दिले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुविधांसंदर्भात अडचणी सोडविण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिल्या. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, डॉ. श्यामकुमार शिरसाम, तहसीलदार विजय लोखंडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
‘प्लाझ्मा थेरपी’चा वापर सुरू करा!
कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्युदर कमी करण्यासाठी ‘प्लाझ्मा थेरपी’ उपचार पद्धतीचा तातडीने वापर सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दिले.