बालकलावंत सादर करणार प्रतिभावंतांचे बालसाहित्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:25 AM2021-02-26T04:25:19+5:302021-02-26T04:25:19+5:30
अकोला : मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून ‘प्रतिभावंतांचे बालसाहित्य बालकांच्या ओठी’ हा कार्यक्रम आभासी ऑनलाईन पद्धतीने शनिवार, ...
अकोला : मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून ‘प्रतिभावंतांचे बालसाहित्य बालकांच्या ओठी’ हा कार्यक्रम आभासी ऑनलाईन पद्धतीने शनिवार, २७ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आला आहे. विदर्भ साहित्य संघ, अकोला शाखेचा हा कार्यक्रम संध्याकाळी प्रसारित केला जाणार आहे.
या अपूर्व अशा कार्यक्रमात बालशिवाजी शाळा, कोठारी कॉन्व्हेंट, स्कूल ऑफ स्कालर्स (हिंगणा रोड), न्यू इंग्लिश हायस्कूल, आरडीजी पब्लिक स्कूल आणि प्रभात किड्स स्कूल या शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. त्यांनी ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज, वि. दा. करंदीकर, गिरीजा कीर यांचे निवडक बालसाहित्य, कविता, बाल नाटिका, नाट्यछटा, कथाकथन अत्यंत सुंदररितीने सादर केले आहे.
बालशिवाजी शाळेचे विद्यार्थी शेखर डांगे, यश बेलेकर, मधुरा परचुरे, अदिती तेलंग; कोठारी कॉन्व्हेंटची जिगीशा गर्गे, स्कूल ऑफ स्कालर्सच्या मधुरा कुलकर्णी, प्राची लाहोळकर, रिदवी अग्रवाल व श्रेया शेगोकार; आरडीजी पब्लिक स्कूलचा सोहन बोरकर, उत्तरा पूरकर आणि गौरी पूरकर; प्रभात किड्स स्कूलची कृष्णाई देशमुख, अंतरा गद्रे, अन्वी जायभाये आणि ईश्वरी पाटील यांनी मराठीतील विविध बालसाहित्य अत्यंत बहारदार पद्धतीने सादर केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभात किड्स स्कूलची विद्यार्थिनी स्निग्धा देशमुख हिने केले आहे.