श्री गुरुदेव सेवा मंडळाचा तालुका मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:14 AM2021-01-09T04:14:50+5:302021-01-09T04:14:50+5:30
निहिदा : अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचा तालुका मेळावा बार्शिटाकळी येथील श्री खोलेश्वर संस्थानात रविवारी पार पडला. अध्यक्षस्थानी ...
निहिदा : अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचा तालुका मेळावा बार्शिटाकळी येथील श्री खोलेश्वर संस्थानात रविवारी पार पडला. अध्यक्षस्थानी जिल्हा सेवाधिकारी रवींद्र मुंडगावकर होते. यावेळी जिल्हा प्रचारप्रमुख डॉ. अशोक रत्नपारखी, तालुका प्रचारप्रमुख देवीदास कावरे, तालुका सेवाधिकारी संतोष सोनोने, ज्येष्ठ मार्गदर्शक, माजी आमदार ज्ञानदेवराव ठाकरे, हरिदास रत्नपारखी, ज्येष्ठ साहित्यिक तुळशिराम बोबडे, मधुकरराव सरप, भीमराव गावंडे, भुजंगराव देशमुख, गुरुवर्य केवळभारती महाराज, ग्रामगीताचार्य डिगंबरराव बायस्कर, तालुका सरचिटणीस रविसिंग डाबेराव, डॉ. गोवर्धनजी खवले, अकोला सेवाधिकारी काशीराम लोखंडे, केंद्रप्रमुख सुरेशराव सावरकर, धनंजय ढोरे, सुरेशराव काठोडे, परमेश्वर मानकर, साहेबराव ठाकरे, कार्यकारी सदस्य श्रीकृष्ण ठोंबरे, बबनराव कावरे, दीपक लुंगे, प्रकाश कळंब, श्रीकृष्ण पांडे, राजेश शिंदे, प्रसिद्धीप्रमुख जेठाभाई पटेल, प्रा. शाहिद ईकबाल खान, राजू कुसदकर, दिनकर मडावी, रावसाहेब घुगे, संजय काळदाते, पुष्पा रत्नपारखी, देवकन्या काळदाते, पार्वती कावरे, वत्सला रत्नपारखी, समता तायडे, शहरप्रमुख श्रीकृष्ण आखरे तसेच तालुक्यातील सर्व ग्राम सेवाधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी तालुक्यातील गुरुदेव सेवकांच्या सहयोगातून, प्रथमच तयार झालेल्या श्री गुरुदेव ज्ञानदर्शिकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवीदास कावरे यांनी केले. मेळाव्याला ज्ञानदेवराव ठाकरे, हरिदास रत्नपारखी, भीमराव गावंडे यांनी मार्गदर्शन केले. मेळाव्यात येणाऱ्या वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचे नियोजन केले. आभार प्रदर्शन सरचिटणीस रविसिंग डाबेराव यांनी केले.