जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीकडे तालुक्याचे लक्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:17 AM2021-03-24T04:17:12+5:302021-03-24T04:17:12+5:30

तेल्हारा: तालुक्यातील अडगाव ,तळेगांव व दानापूर या तीन जिल्हा परिषद व वाडी अदमपुर, अडगाव , हिवरखेड व भांबेरी या ...

Taluka's attention to Zilla Parishad, Panchayat Samiti elections! | जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीकडे तालुक्याचे लक्ष!

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीकडे तालुक्याचे लक्ष!

Next

तेल्हारा: तालुक्यातील अडगाव ,तळेगांव व दानापूर या तीन जिल्हा परिषद व वाडी अदमपुर, अडगाव , हिवरखेड व भांबेरी या चार पंचायत समितीच्या निवडणूकीची आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये काही विद्यमान सदस्यांना फटका बसणार असण्याची शक्यता आहे. मात्र इच्छुक उमेदवार सुध्दा आपले पत्ते उघडत नसल्याने वेट अँड वाचच्या भूमिकेत दिसत आहेत. दानापूर जिल्हा परिषद मतदारसंघ आता सर्वसाधारण निघाल्याने मतदारसंघात इच्छुकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.

गेल्या वेळी वंचीत बहुजन आघाडीच्या मतांचे विभाजन झाले. त्यामुळे कमी मताने पराभूत भाजपचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिल्याने निवडणूक यावेळी सोपी नाही. असे बोलल्या जात आहे तर अडगाव जिप मतदार संघात गेल्या निवडणूक मध्ये वंचितच्या उमेदवार प्रमोदिनी कोल्हे यांनी हजारावर लीड कायम ठेवत विजय संपादन केला होता. त्याना आरक्षणाचा फारसा फटका बसणार नसून गेल्या वेळी त्यांच्या सोबत पंचायत समितीच्या सभापती यांना सुद्धा आरक्षणाचा फटका बसला नसल्याने येथील समीकरण फार काही जास्त बदलणार नाहीत. अशी चर्चा आहे. तळेगाव जिप सर्वसाधारण महिला निघाल्याने मध्ये आरक्षणाचा सुद्धा फारसा फरक पडला नसल्याने विजयी व पराभुत झालेले उमेदवार यावेळी पुन्हा या मतदारसंघात उभे राहण्याच्या तयारीत आहेत. काही घरी बसलेले पार्सल उमेदवारही या मतदारसंघात उडी घेऊ शकतात अशी चर्चा आहे. हिवरखेड पस मतदारसंघातुन निवडून आलेल्या सदस्य आज रोजी उपसभापती असून त्यांना जरी आरक्षणाचा फटका बसला नसला, तरी मात्र त्या केवळ सोळा मतांनी विजयी झाल्या होत्या. त्यामुळेयावेळी सर्वसाधारण महिला आरक्षण निघाल्याने पराभूत किंवा इतर इच्छुक उमेदवारांची गर्दी होऊ शकते. वाडी अदमपुर पं. स. मतदारसंघ सर्वसाधारण निघाल्याने येथील वंचित उमेदवाराला अपक्ष उमेदवाराने गेल्यावेळी चांगली लढत दिली हाेती. कमी मताने पराभूत उमेदवार झालेले उमेदवार पुन्हार रिंगणात उभे राहुन समीकरण बिघडू शकतात तर भांबेरी पंचायत समिती मतदारसंघाचे आरक्षण सुध्दा सर्वसाधारण निघाले आहे. येथे सेनेचे उमेदवार सुद्धा कमी मताने पराभूत झाल्याने येथे सुद्धा इच्छुक उमेदवारांची संख्या वाढू शकते. त्यामुळे भाजपच्या उमेदवार समोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. यावेळी आठ पैकी तीन जिल्हा परिषद व सतरापैकी चार जागांवर पंचायत समितीच्या निवडणूक होऊ घातल्याने यावेळी राजकीय नेते व पुढारी तसेच सहकार गटातील नेते मंडळींनी पुढाकार घेतल्याने, निवडणूक रंगतदार होणार हे निश्चित.

Web Title: Taluka's attention to Zilla Parishad, Panchayat Samiti elections!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.