उद्दिष्ट ९ लाख; खड्डे ६६ हजार
By admin | Published: July 8, 2014 12:17 AM2014-07-08T00:17:49+5:302014-07-08T00:17:49+5:30
वृक्ष लागवड योजनेंतर्गत यावर्षी जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यात ९ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले
अकोला : शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत यावर्षी जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यात ९ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असले तरी, वृक्ष लागवडीसाठी जूनअखेर जिल्ह्यात केवळ ६६ लाख ५९0 खड्डे करण्यात आले आहेत.
गेल्या १ एप्रिल रोजीच्या शासन परिपत्रकानुसार, यावर्षीच्या पावसाळ्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर करावयाच्या वृक्ष लागवडीत, वृक्ष लागवड महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत आणि वृक्ष लागवडीसाठी खड्डे पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेतून ग्रामपंचातींमार्फत करण्यात येत आहेत. यावर्षी शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत रोहयोतून यावर्षी जिल्ह्यात जिल्हा परिषदेमार्फत ९ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यासाठी पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेंतर्गत ग्रामपंचायतींमार्फत खड्डे खोदण्याचे काम करण्यात येत आहे. जिल्ह्यात वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ९ लाख असले तरी, जून अखेरपर्यंत वृक्ष लागवडीसाठी जिल्ह्यात केवळ ६६ हजार ५९0 खड्डे खोदण्याचे काम करण्यात आल्याचे चित्र आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत आतापर्यंत खोदण्यात आलेल्या खड्डय़ांचे प्रमाण बघता, जिल्ह्यात यावर्षी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.