विश्वशांतीचा संदेश देणारे ‘नि:शस्त्र योद्धा’ तथागत गौतम बुद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 02:58 PM2018-12-15T14:58:20+5:302018-12-15T14:58:56+5:30
महापुरुषांच्या जीवनात दोनच गोष्टी संभवतात. त्या म्हणजे एक तर चक्रवर्ती राजा किंवा सम्यक संबुद्ध होईल, असे तथागत गौतम बुद्धांच्या जीवनातील प्रसंगाचे सुरेख दर्शन ‘नि:शस्त्र योद्धा’ या नाटकातून करण्यात आले.
अकोला: तथागत गौतम बुद्धांच्या जीवनातील अहिंसा तत्त्वावर आधारित जगाच्या कल्याणासाठी शांततेचा संदेश देणारे योद्धा, शुद्धोधन राजाच्या पोटी जन्माला येऊन ३२ लक्षणांनी युक्त असल्याचे असितमुनी त्यांच्याकडे पाहून भविष्य वर्तवितात. इतकेच नाही, तर अशा महापुरुषांच्या जीवनात दोनच गोष्टी संभवतात. त्या म्हणजे एक तर चक्रवर्ती राजा किंवा सम्यक संबुद्ध होईल, असे तथागत गौतम बुद्धांच्या जीवनातील प्रसंगाचे सुरेख दर्शन ‘नि:शस्त्र योद्धा’ या नाटकातून करण्यात आले.
बुलडाण्याच्या विश्वमित्र सांस्कृतिक संस्थेने ५८ व्या महाराष्ट्र राज्य मराठी हौशी नाट्य स्पर्धेतील अकोला विभागातील प्राथमिक फेरीतील अंतिम नाटक गुरुवारी सादर केले. या प्रायोगिक नाटकाचे लेखन रोहित पगारे यांनी तर दिग्दर्शन जयंत दलाल यांनी अतिशय सुंदर केले. राजा शुद्धोधनाची भूमिका अतुल मेहकरकर यांनी साकारली. असित मुनी-शैलेश बनसोड, मारिचा-अर्चना जाधव, मारा-पराग काचकुरे, षड्रा- पूजा शिरसोले, तथागत गौतम बुद्ध- योगेश जाधव, यशोधरा- संजीवनी बोराडे, राहुल- अथर्व जाधव, सैनिक ांची भूमिका आशिष मोहरिर, प्रतीक शेजोळ यांनी उत्तमपणे साकारली. प्रकाश योजना लक्ष्मीकांत गोंदकर, नेपथ्य पवन बाबरेकर, संगीत विजय सोनोने, वेशभूषा अंजली परांजपे, रंजना बोरीकर, रंगभूषा अनिकेत गायकवाड, चेतन भोळे यांची होती. रंगमंच व्यवस्था दिनेश उजाडे, श्रीराम पुराणिक, सहकार्य रवींद्र इंगळे, गणेश देशमुख, योगेश बांगडभट्टी, जितेंद्र जैन, कुलदीप शेजोळ, विजय परसने, कुणाल खर्चे व अभिलाष चौबे यांचे लाभले.
ज्येष्ठ रंगकर्मी राम जाधव यांचा सत्कार
अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष राम जाधव यांच्या सत्कार स्पर्धेचे परीक्षक डॉ. शशिकांत चौधरी कोल्हापूर, प्रतिभा पाटील मुंबई आणि राजेंद्र जोशी औरंगाबाद यांच्या हस्ते करण्यात आला. मालती भोंडे यांनीदेखील राम जाधव यांचा सत्कार केला. त्यावेळी परीक्षक राजेंद्र जोशी आणि राम जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. जाधव म्हणाले, की स्पर्धा ही कलावंतांसाठी दिवाळी असते. तीन-चार महिन्यांचे त्यामागे परिश्रम असतात. नाटक ही सातत्याने होणारी प्रक्रिया आहे. कारण येथे थांबायला कोणालाच वाव नसतो. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत जामदार यांनी केले.
स्पर्धेचा निकाल सोमवारी
नाट्य स्पर्धेचा निकाल मुंबईला सोमवारी जाहीर होण्याची शक्यता यावेळी परीक्षकांनी व्यक्त केली. अकोला केंद्रावर झालेली नाटके चांगली होती, तसेच निकालामध्ये पारदर्शकता राहील, अशी ग्वाही परीक्षकांनी दिली.