आकोटात पाण्याकरीता वृषभराजाची मिरवणुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2017 07:45 PM2017-07-10T19:45:08+5:302017-07-10T19:45:08+5:30
आकोट (अकोला) : आकोटचे ग्रामदैवत मानल्या जाणारे शहरातील नंदीपेठ या भागातुन शेतकरी बांधवानी 10 जुलै रोजी वरूणराजाला प्रसन्न करण्याकरीता वृषभराजाची मिरवणुक काढली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आकोट (अकोला) : आकोटचे ग्रामदैवत मानल्या जाणारे शहरातील नंदीपेठ या भागातुन शेतकरी बांधवानी 10 जुलै रोजी वरूणराजाला प्रसन्न करण्याकरीता वृषभराजाची मिरवणुक काढली.
मृग नक्षत्र कोरडे गेल्यागत स्थिती आकोट तालुक्याची आहे. शेतकरी बांधवाणी पेरणी केली. पंरतु पावसाने हुलकावणी दिली.त्यामुळे नंदीकेश्ववर मंदीरात असलेल्या पुरातण महाकाय नंदीची पुजा करून शेतकरीनी पावसाकरीता महादेवाला साकडे घातले. नंदीपेठ हा परीसर शेतकरी-शेतमजुर व वृषभराजाचे पालनपोषन करणारा कष्टाळु भाग. या ठिकाणी महाकाय नंदी असल्याने नंदीपेठेमधील शेतकरीची श्रध्दा असलेल्या नंदीबैलाची मिरवणुक काढण्यात आली.
वरूण राजाला पाण्यासाठी साकड घालण्याकरिता नंदीकेश्वर मंदीर येथून नंदीबैलाची ही भव्य मिरवणूक पाण्याचे व महादेवाचे गाणे गात काढण्यात आली. शेतकरी बांधवानी आपले नंदीबैल या मिरवणूकीत सजवुन व विविध फलक लावुन सामील केले. नंदीकेश्वरास पाण्या साठी साकड घालत ही आगळीवेगळी मिरवणुक पोळ्यापुर्वीच आकोट शहरात काढण्यात आली.