टॅक्सची थकबाकी भोवली; दोन मोबाइल टॉवर सील!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 12:09 PM2020-03-17T12:09:37+5:302020-03-17T12:09:44+5:30
मोबाइल कंपन्यांचे दोन टॉवर सील करण्याची कारवाई सोमवारी मनपाच्यावतीने करण्यात आली.
अकोला : महापालिकेचा मालमत्ता कर जमा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या मोबाइल कंपन्यांचे दोन टॉवर सील करण्याची कारवाई सोमवारी मनपाच्यावतीने करण्यात आली.
महापालिका प्रशासनासमोर मालमत्ता कर जमा करण्याचे मोठे आव्हान ठाकले आहे. ही बाब लक्षात घेता आयुक्त संजय कापडणीस, उपायुक्त वैभव आवारे यांनी कर वसुलीसाठी धडक मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. शहरात उभारण्यात आलेल्या मोबाइल टॉवरप्रकरणी संबंधित कंपन्यांनी मनपाकडे मालमत्ता कर जमा करणे भाग असताना मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पूर्व झोन अंतर्गत राम नगरस्थित सुरेश पाटील (जीटीएल मोबाइल टॉवर) यांच्याकडे २०१७ पासून २ लक्ष १३ हजार रुपये तसेच दक्षिण झोन अंतर्गत आदर्श कॉलनी येथील अलकनंदा ढोरे (जीटीएल मोबाइल टॉवर) यांच्याकडे २०१३ पासून १ लक्ष ९२ हजार रुपये कर थकीत होता. सोमवारी संबंधितांचे दोन्ही मोबाइल टॉवर सील करण्यात आले. या कारवाईत सहा. कर अधीक्षक देवेंद्र भोजने, प्रशांत बोळे, सुधीर माल्टे, महेंद्र लंगोटे, उदय ठाकूर, सागर मानकर, दिपराल महल्ले, राजू साळुंके, मोहन घाटोळ, सुरक्षा रक्षक प्रदीप गवई, नीलेश ढगे, शोभा पांडे, तेजराव तायडे आदींची उपस्थिती होती.