बाळापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात तायडे यांनी केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:19 AM2021-07-28T04:19:26+5:302021-07-28T04:19:26+5:30
बाळापूर तालुक्यातील पारस, जोगलखेड, आडोशी-कडोशी, कसुरा, कळंबा या शिवारांत काँग्रेसचे नेते प्रकाश तायडे यांनी पाहणी केली. परिसरात पावसामुळे शेतरस्ते ...
बाळापूर तालुक्यातील पारस, जोगलखेड, आडोशी-कडोशी, कसुरा, कळंबा या शिवारांत काँग्रेसचे नेते प्रकाश तायडे यांनी पाहणी केली. परिसरात पावसामुळे शेतरस्ते वाहून गेले, तर काही शेतजमीन पिकांसह खरडून गेली. या भागात सर्व्हे सुरू असून, शासनाकडून मदत मिळवून दिल्या जाणार आहे. खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला असून, रब्बी हंगामासाठी बियाणे व खते शासनाने उपलब्ध करून द्यावे, यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, कृषिमंत्री विश्वजित कदम यांच्याकडे मागणी करणार असल्याचे काँग्रेस नेते प्रकाश तायडे यांनी सांगितले. शेत शिवारांमध्ये पाहणी करताना वसंतराव रौंदळे, रमेश तायडे, तंटामुक्ती अध्यक्ष बाबूभाई, रामराव खोपडे, जोगलखेडचे माजी सरपंच बळीराम पिंपळकर, ग्रा. पं. सदस्य सुरेश सोनवणे, विलास इंगळे, विजय शाहू, गोपाल भरणे, मधुकर भरणे, राजू भड, मनोहर वानखडे, संजय घटे, बाळू भगत, प्रल्हाद भगत, मनोहर आप्पा कारंजकर, विष्णू भगत, सुभाष तायडे, भीमराव गायकवाड, चिकटे, केशव इंगळे, शामराव काळपांडे, बाबूराव तायडे, पांडुरंग रौंदळे, श्यामराव खोपडे, कोंडोजी म्हैसने, अशोक म्हैसने, कृषी सहायक अवचार आदी उपस्थित होते. (फोटो)