लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना चहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:17 AM2021-03-20T04:17:47+5:302021-03-20T04:17:47+5:30
काेराेना चाचणी केंद्र वाढवा अकाेला : कोविड संसर्गामुळे व्यापाऱ्यांना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले असले तरी पुरेशा चाचणी केंद्रांची ...
काेराेना चाचणी केंद्र वाढवा
अकाेला : कोविड संसर्गामुळे व्यापाऱ्यांना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले असले तरी पुरेशा चाचणी केंद्रांची सुविधा नाही. परिणामी चाचणी केंद्रांवर व्यापारी, नागरिकांची गर्दी होत आहे. त्यातून संसर्ग अधिकच वाढण्याची शक्यता असल्याने कोविड चाचणी केंद्र वाढविण्याची मागणी भाजपचे प्रवक्ते नगरसेवक गिरीश जोशी यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
धान्याचे वाटप रखडले
अकाेला : मागील अनेक दिवसांपासून शिधापत्रिकाधारक नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य वाटप होत नसल्याचे समाेर आले आहे. शासनाने मका देण्याचा निर्णय घेतला असून विदर्भ व मराठवाड्यात मका कोणी खात नाही. शासनाने तातडीने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा, अशी मागणी शुक्रवारी भाजपतर्फे करण्यात आली आहे.
अकाेलेकरांनाे, नियमांचे पालन करा!
अकाेला : शहरात काेराेनाचा प्रादुर्भाव झाला असून काेराेना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. नागरिकांना साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याची सूचना वारंवार केली जात असतानादेखील नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. नागरिकांनी काेराेनाचा वाढता धाेका लक्षात घेता नियमांचे पालन करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.
झाेननिहाय चाचणी केंद्र सुरू
अकाेला : महापालिका क्षेत्रात काेराेनाचा माेठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे. या संसर्गाला आळा घालण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांच्या चाचण्या व्हाव्यात या उद्देशातून मनपा प्रशासनाने झाेननिहाय चाचणी केंद्र उघडले आहेत. शुक्रवारी पश्चिम झाेनमधील कस्तुरबा गांधी रुग्णालयातील चाचणी केंद्रात नागरिकांची झुंबड उडाल्याचे पहावयास मिळाले.
महापालिकेत नियम पायदळी
अकाेला : काेराेनाच्या अनुषंगाने मनपा प्रशासनाकडून सातत्याने साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. दुसरीकडे मनपा कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांसह खुद्द काही कर्मचारी व नगरसेवक नियम पायदळी तुडवीत असल्याचे शुक्रवारी पहावयास मिळाले. फिरत्या व्हॅनच्या उद्घाटनप्रसंगी काही नगरसेवकांनीच ताेंडाला मास्क न लावणे पसंत केले.