शिक्षकांना वरिष्ठ, निवड श्रेणी लागू करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 06:22 PM2020-02-01T18:22:19+5:302020-02-01T18:22:53+5:30
शनिवारी दुपारी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वात शिक्षकांनी शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद यांना घेराव घातला आणि त्यांना निवेदन दिले.
अकोला: राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, तसेच जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका शाळांमधील शिक्षक कर्मचाऱ्यांना २६ आॅगस्ट २0१९ च्या शासन निर्णयानुसार शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी शनिवारी दुपारी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वात शिक्षकांनी शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद यांना घेराव घातला आणि त्यांना निवेदन दिले.
निवेदनामध्ये शासन निर्णयानुसार शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करण्यासाठी प्रशिक्षणाची अट वगळण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले असल्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी लागू करण्याबाबतची यादी प्रसिद्ध करण्यात यावी. अशी मागणी विमाशि संघाने केली आहे. शिक्षणाधिकाºयांना घेराव घालून शिक्षकांना वरिष्ठ, निवड श्रेणी लागू करण्याची मागणी रेटून धरण्यात आली. यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विजय ठोकळ, विभागीय कार्यवाह जयदीप सोनखासकर, जिल्हा कार्यवाह प्रदीप थोरात, अकोला तालुकाध्यक्ष जी.पी. ढगे, बार्शिटाकळी तालुकाध्यक्ष चंद्रकांत गव्हाणे, रामेश्वर तायडे, बी.जे. नंदाने, राजेश शेंडे, दिलीप देशमुख, जिल्हा सहकार्यवाह व्ही.जी. माळी, प्रविण लाजुरकर, माणिक गायकी, शशांक मोहोड, विजय अंधारे, दादा वंजारे, श्रीकांत दांदळे, विजय अंधारे, एस.डी. राठोड, शिवाजी ढगे, मो. चि. रेवस्कर, दे. व्य. घोरळ, गो. सांगुनवेढे, आशिष दांदळे, रितेश सांगळे, एस.एम. माथने, पी.व्ही. उजाडे, गजानन थोरात आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)