शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षात शिक्षकाचा विष घेण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 10:12 AM2020-03-05T10:12:14+5:302020-03-05T10:12:33+5:30
हा प्रकार घडत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनीही शिक्षणाधिकारी कार्यालयात धाव घेतली.
अकोला : शामकी माता प्राथमिक शाळा पिंजर येथे कार्यरत असताना मार्च २०१५ पासून थांबविलेले वेतन मिळावे, यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकास देयक सादर करण्याचे निर्देश द्यावे, या मागणीसाठी सहायक शिक्षक प्रवीण गणेश चव्हाण यांनी पत्नीसह शिक्षणाधिकारी कार्यालयातच विष घेण्याची तयारी केली. शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी सुनावणी घेत संबंधितांचे म्हणणे ऐकून घेतले. हा प्रकार घडत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनीही शिक्षणाधिकारी कार्यालयात धाव घेतली.
या सुनावणीसाठी शिक्षकाने लेखी जबाब सादर केला. त्यामध्ये शाळेतील डिगांबर किसन गिºहे यांचा सेवासातत्याचा प्रस्ताव खोटा व बनावट आहे. त्यासाठी लेटरपॅड व माझ्या स्वाक्षरीचा गैरवापर करण्यात आला. त्यामुळे तो प्रस्ताव रद्द करावा, मार्च २०१५ पासून नियमित कामासोबतच मुख्याध्यापकाचा प्रभारही सांभाळला. तरीही वेतन थांबविले आहे. दरम्यान, हे प्रकरण अमरावती येथील शाळा न्यायाधीकरणात सुरू आहे. त्या प्रकरणात गिºहे २००७ ते २०१५ या कालावधीत सतत गैरहजर आहेत. ही बाब चौकशी अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली नाही. त्यामुळे चुकीचा निकाल लागला. आपणाला शिक्षण विभागाने सेवेतून अद्यापही कमी केलेले नाही.
शाळेच्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरत असल्यास समायोजन करावे, या मागणीसाठी शिक्षकाने शिक्षणाधिकारी कार्यालयात धाव घेतली. प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सातत्याने खोटे बोलतात. त्यांची आर्थिक मागणी पूर्ण न केल्याने त्यांनी गिºहे नामक शिक्षकासाठी हा सगळा खटाटोप केला आहे. कुटुबांची परिस्थिती हलाखीची असल्याने आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणी चव्हाण यांनी शिक्षणाधिकाºयांकडे केली.