सीईओंच्या कक्षासमोरच शिक्षकांची हाणामारी

By admin | Published: March 21, 2017 02:49 AM2017-03-21T02:49:50+5:302017-03-21T02:49:50+5:30

जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या समस्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसमोर मांडण्यासाठी आलेल्या दोन संघटनांच्या पदाधिकार्‍यांची आपसात हाणामारी झाल्याने प्रकरण पोलिसात गेले आहे.

Teacher rioters in front of CEO | सीईओंच्या कक्षासमोरच शिक्षकांची हाणामारी

सीईओंच्या कक्षासमोरच शिक्षकांची हाणामारी

Next

अकोला, दि. २0- जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या समस्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसमोर मांडण्यासाठी आलेल्या दोन संघटनांच्या पदाधिकार्‍यांची आपसात हाणामारी झाल्याने प्रकरण पोलिसात गेले आहे. प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्या मुख्य कार्यकारी अधिकारी विधळे यांच्यासमक्ष मांडण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षकांच्या समन्वय समितीचे पदाधिकारी सोमवारी दुपारी जमले. यावेळी दोनशेपेक्षाहीअधिक शिक्षक उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जमिरउल्लाखॉ पठाण यांच्यासह काही मोजके शिक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी कक्षात गेले. त्यावेळी कक्षालगतच्या परिसरात चांगलीच गर्दी झाली होती. त्यातच महाराष्ट्र राज्य अपंग माध्यमिक शिक्षक संघटनेचे जावेद इकबाल यांनी काहीतरी बोलत शिवीगाळ केल्याचे प्रत्यक्षदश्रींचे म्हणणे आहे. त्यावेळी महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे मो. आबेद यांनी त्यांना अधिकार्‍यांचा कक्षात तसे बोलू नका, असे म्हटले. त्यावरून वाद वाढल्याने दोघांनीही एकमेकांना मारहाण केल्याची घटना घडली. त्यामध्ये जावेद इकबाल यांच्या चेहर्‍याला इजा होऊन रक्तस्राव झाला. याप्रकरणी त्यांनी सिटी कोतवाली पोलिसात मारहाणीची तक्रार केली आहे. त्यांच्यावर सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हे दाखल झाले नव्हते. वरली अड्डय़ावर धाड अकोट: शहरातील फिरदौस प्लॉट परिसरात वरली मटक्याची खायवाडी करताना एक जण मिळून आला. त्याच्यावर शहर पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला. पोलीस सूत्रानुसार, फिरदौस प्लॉट येथे साबीर शहा इब्राहीम शहा हा २0 मार्च रोजी पोलिसांना वरली मटक्याची खायवाडी करताना मिळून आला. त्याच्याकडे नगदी ९४0 रुपये मिळून आले. या प्रकरणी फिर्यादी हे.काँ. संतोष सुरवाडे यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध कलम १२ ह्यअह्ण मुंबई जुगार कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

Web Title: Teacher rioters in front of CEO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.