शिक्षकांची बदली प्रक्रिया २५ मार्चपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:19 PM2019-03-11T12:19:32+5:302019-03-11T12:19:39+5:30

अकोला: शिक्षकांच्या आॅनलाइन बदली प्रक्रियेसाठी कोकण विभाग वगळता उर्वरित विभागामध्ये येत्या २५ मार्चपासून अर्ज भरण्याला सुरुवात होणार आहे.

Teacher transfer process start from March 25 | शिक्षकांची बदली प्रक्रिया २५ मार्चपासून

शिक्षकांची बदली प्रक्रिया २५ मार्चपासून

Next

अकोला: शिक्षकांच्या आॅनलाइन बदली प्रक्रियेसाठी कोकण विभाग वगळता उर्वरित विभागामध्ये येत्या २५ मार्चपासून अर्ज भरण्याला सुरुवात होणार आहे. त्यासाठी शासनाने बदल केलेल्या धोरणानुसार आवश्यक माहिती १९ मार्चपर्यंत तयार ठेवण्याचा आदेश ग्रामविकास विभागाने ८ मार्च रोजी दिला आहे. विशेष म्हणजे, कोकण विभागातील बदली प्रक्रिया मार्च अखेरपर्यंतच पूर्ण होणार आहे.
जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यासाठी शासनाने २७ फेब्रुवारी २०१७ रोजी सुधारित धोरण निश्चित केले. त्यामध्ये बदलीपात्र शिक्षकांची व्याख्या देण्यात आली. त्यानुसार संबंधित शिक्षकाची सर्वसाधारण व अवघड क्षेत्रात १० वर्षे सेवा झाली असल्यास ते शिक्षक बदलीपात्र समजण्यात आले; मात्र सर्वसाधारण क्षेत्रातील शिक्षक एकदा बदली झाल्यानंतर जोपर्यंत अवघड क्षेत्रात जात नाहीत, तोपर्यंत ते बदलीसाठी पात्र ठरतात. त्यामुळे नवीन धोरणानुसार त्यांची दरवर्षी बदली होऊ शकते, ही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेतून न्यायालयापुढे मांडण्यात आली. त्यावेळी शासनाने बदलीपात्र शिक्षकांची संगणकीय प्रणालीद्वारे एकदा बदली झाल्यानंतर पुन्हा तीन वर्षे त्यांची बदली केली जाणार नाही, असे न्यायालयात स्पष्ट केले. त्यासाठी बदली प्रक्रियेचा २७ फेब्रुवारी २०१७ रोजीच्या आदेशातील बदलीपात्र शिक्षकाच्या व्याख्येत बदल केला. त्यामध्ये बदलीपात्र शिक्षक म्हणजे, ज्या शिक्षकाची बदलीस निश्चित धरावयाची सेवा १० वर्षे पूर्ण झाली आहे आणि विद्यमान शाळेत त्या शिक्षकाची सेवा किमान तीन वर्षे पूर्ण झाली आहे, असा बदल ग्रामविकास विभागाने ८ मार्च रोजी केला आहे. या बदलानुसार आता चालू वर्षातील बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
- १९ मार्चर्यंत होणार मॅपिंग!
जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बदलीसाठी आवश्यक माहिती तयार ठेवण्याचे बजावण्यात आले. त्यामध्ये बदलीपात्र शिक्षक, बदली अधिकार प्राप्त शिक्षक, निव्वळ रिक्त जागा, अनिवार्य रिक्त जागांच्या याद्या १९ मार्चपर्यंत बदली प्रक्रियेतील नव्या व्याख्येनुसार संगणकीय प्रणालीत नोंद (मॅपिंग) करण्याचा आदेश देण्यात आला. त्यानंतर २५ मार्चपासून संगणकीय प्रणाली सुरू होणार आहे. त्याबाबत शिक्षकांना माहिती देण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

 

Web Title: Teacher transfer process start from March 25

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.