बिंदू नामावलीतील घोळ शिक्षकच शोधणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 03:36 PM2018-05-04T15:36:41+5:302018-05-04T15:36:41+5:30

अकोला : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तयार केलेल्या बिंदू नामावलीत प्रचंड घोळ झाल्याच्या तक्रारी विविध शिक्षक संघटनांसह अनेकांनी केल्या आहेत.

 The teacher will find irregularities in roster | बिंदू नामावलीतील घोळ शिक्षकच शोधणार!

बिंदू नामावलीतील घोळ शिक्षकच शोधणार!

googlenewsNext
ठळक मुद्देमराठी शिक्षकांच्या बिंदू नामावलीचा प्रस्ताव सादर करताना शिक्षण विभागाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल केली. बिंदू नामावलीचा प्रस्ताव तयार करताना मोठ्या प्रमाणात शिक्षकांचे आर्थिक शोषण करण्यात आले. सहा शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीने अकोला जिल्हा परिषदेत रूजू झाल्याच्या दिनांकाची माहिती मागवण्यात आली आहे.


अकोला : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तयार केलेल्या बिंदू नामावलीत प्रचंड घोळ झाल्याच्या तक्रारी विविध शिक्षक संघटनांसह अनेकांनी केल्या आहेत. त्यातील घोळ शोधून काढण्यासाठी विविध प्रकारची माहिती घेण्याचे प्रयत्नही अनेकांनी सुरू केले. त्यासाठी विभागीय आयुक्तांकडे तक्रारी करून त्यासाठीची माहितीही मागवण्यात आली आहे. अकोला पंचायत समितीमधील सहा शिक्षकांच्या रूजू दिनांकाची माहिती मागवल्याने घोळाची शक्यता बळावली आहे.
मराठी शिक्षकांच्या बिंदू नामावलीचा प्रस्ताव सादर करताना शिक्षण विभागाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल केली. सोबतच मागासवर्ग कक्षाला संपूर्ण माहिती दिली नाही. काही प्रकरणात खोटे दस्तऐवज सादर करण्यात आले. त्यातून बिंदू नामावलीत अपात्र ठरणाºया शिक्षकांना मूळ बिंदूतून अपात्र ठरण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही शिक्षकांच्या जातीच्या संवर्गातच बदल करण्यात आले. त्यातून बिंदू नामावलीचा प्रस्ताव तयार करताना मोठ्या प्रमाणात शिक्षकांचे आर्थिक शोषण करण्यात आले. शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी-कर्मचारी यांनी बनावट दस्तऐवज सादर करून मागासवर्ग कक्षाकडून बिंदू नामावली मंजूर करून घेतली. हा प्रकार आता विविध शिक्षक संघटनांसह काही शिक्षकांनी केलेल्या तक्रारीमुळे उघड झाला आहे.
विभागीय आयुक्तांकडे सहायक शिक्षक विलास मोरे यांच्या निवेदनानुसार, अकोला पंचायत समितीमधील सहा शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीने अकोला जिल्हा परिषदेत रूजू झाल्याच्या दिनांकाची माहिती मागवण्यात आली आहे.

आंतरजिल्हा बदलीने आलेल्यांची मागवली माहिती
आंतरजिल्हा बदलीने जिल्हा परिषदेत आलेल्या शिक्षकांच्या रूजू झाल्याच्या दिनांकाची माहिती मागवण्यात आली. त्यामध्ये गोत्रा येथील अरुण फुकट, मोरगाव भाकरे येथील रूपाली रामदास डहाके, निंभोरा येथील राजेंद्र मुरलीधर तरोळे, म्हैसांग येथील गुलाब ज्ञानदेव घावट, कासली खुर्द येथील उषा विश्वनाथ तालोट, दोनवाडा येथील नरेश त्र्यंबक घावट यांचा समावेश आहे.

 

Web Title:  The teacher will find irregularities in roster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.