शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन आॅफलाइन पद्धतीने वितरित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 01:14 PM2018-08-24T13:14:40+5:302018-08-24T13:16:45+5:30

आॅगस्ट २0१८ ते मार्च २0१९ पर्यंतचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन आॅफलाइन पद्धतीने वितरित करण्याचा आदेश शासनाने दिला आहे.

Teachers and non-teaching staff will be paid offline | शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन आॅफलाइन पद्धतीने वितरित होणार

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन आॅफलाइन पद्धतीने वितरित होणार

Next
ठळक मुद्देसॉफ्टवेअर दुरुस्त होत नसल्यामुळे अनेकदा शिक्षक, शिक्षकांचे वेतन रखडत आहे.त्यामुळे शिक्षक संघटनांनी याबाबत आंदोलनाची भूमिका घेतली होती. आॅगस्ट २0१८ ते मार्च २0१९ या कालावधीतील नियमित व थकीत वेतन आॅफलाइन पद्धतीने देण्याचा निर्णय घेतला आहे.


अकोला : राज्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन आॅनलाइन पद्धतीने व्हायचे; परंतु अनेक महिन्यांपासून शालार्थ प्रणालीचे डाटा बेस सॉफ्टवेअर बंद पडले आहे. सातत्याने प्रयत्न करूनही सॉफ्टवेअरमध्ये दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे आॅगस्ट २0१८ ते मार्च २0१९ पर्यंतचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन आॅफलाइन पद्धतीने वितरित करण्याचा आदेश शासनाने दिला आहे.
राज्यातील खासगी अंशत: व पूर्णत: अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व अध्यापक विद्यालयांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांची माहिती शालार्थ प्रणालीच्या सॉफ्टवेअरमध्ये भरावी लागत होती. त्यानंतरच शिक्षक, शिक्षकांचे आॅनलाइन वेतन निघत असे; परंतु गत पाच ते सहा महिन्यांपासून शालार्थ प्रणालीच्या डाटा बेस सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. शिक्षण विभागाच्यावतीने सॉफ्टवेअर दुरुस्तीसाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत असूनही, सॉफ्टवेअर दुरुस्त होत नसल्यामुळे अनेकदा शिक्षक, शिक्षकांचे वेतन रखडत आहे. त्यामुळे शिक्षक संघटनांनी याबाबत आंदोलनाची भूमिका घेतली होती. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना वेतनापासून वंचित राहावे लागत असल्यामुळे शिक्षण विभागाने आता आॅगस्ट २0१८ ते मार्च २0१९ या कालावधीतील नियमित व थकीत वेतन आॅफलाइन पद्धतीने देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच अर्धवेळा, रजा कालावधीत नियुक्त आणि तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे नियमित व थकीत वेतनसुद्धा आॅफलाइन पद्धतीने देण्यात येणार आहे.


९४१७ शिक्षकांचे वेतन आॅफलाइन
राज्यातील अनुदानासाठी पात्र घोषित केलेल्या, वैयक्तिक मान्यता दिलेल्या अशा एकूण ९ हजार ४१७ शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाºयांचे वेतन आॅफलाइन पद्धतीने काढण्याचा आदेश देण्यात आला आहे. शिक्षकांनी या निर्णयामुळे आनंद व्यक्त केला आहे.

गत काही महिन्यांपासून शालार्थ प्रणालीच्या डाटा बेस सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्याची दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांचे वेतन रखडू नये, यासाठी शासनाने आॅफलाइन पद्धतीने वेतन देण्याचा आदेश दिला आहे.
प्रकाश मुकुंद,
शिक्षणाधिकारी,
माध्यमिक.

 

Web Title: Teachers and non-teaching staff will be paid offline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.