महात्मा फुले महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून वेतन नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:17 AM2021-05-24T04:17:43+5:302021-05-24T04:17:43+5:30
पातूर येथील महात्मा फुले विज्ञान व कला महाविद्यालयाच्या काही कर्मचारी व संस्थाचालकांत वाद आहे. गेल्या काही महिन्यांअगोदर येथील ...
पातूर येथील महात्मा फुले विज्ञान व कला महाविद्यालयाच्या काही कर्मचारी व संस्थाचालकांत वाद आहे. गेल्या काही महिन्यांअगोदर येथील कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयासमोर उपोषणसुद्धा केले होते. येथील प्राचार्यांनासुद्धा निलंबित करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्यामुळे कोरोना संकटात त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, घरातील ज्येष्ठांचे आरोग्य, औषधोपचार कसा करावा, आदी प्रश्न निर्माण झाले आहेत. यासंदर्भात येथील कर्मचाऱ्यांनी शिक्षण संचालक उच्च शिक्षण संचालनालय (पुणे) व सहसंचालनालय (अमरावती) यांना नुकतेच निवेदनसुद्धा दिले आहे. या निवेदनाची दखल घेत सहसंचालनालय उच्च शिक्षण (अमरावती) यांनी पत्र देऊन कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचा प्रश्न निकाली काढण्याचे पत्र महात्मा फुले विज्ञान व कला महाविद्यालयास दिले आहे.