अवघड क्षेत्रातील गावांची यादी प्रकाशित करण्याची शिक्षक समितीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:17 AM2021-04-16T04:17:39+5:302021-04-16T04:17:39+5:30

महसूल विभाग, उपवनसंरक्षक व परिवहन महामंडळ, बीएसएनएल यांच्याशी संपर्क साधून व येण्या-जाण्याकरिता त्रासाचे व राज्य महामार्गापासून दूर, हिस्र प्राण्यांचा ...

Teachers' committee demands publication of list of villages in difficult areas | अवघड क्षेत्रातील गावांची यादी प्रकाशित करण्याची शिक्षक समितीची मागणी

अवघड क्षेत्रातील गावांची यादी प्रकाशित करण्याची शिक्षक समितीची मागणी

Next

महसूल विभाग, उपवनसंरक्षक व परिवहन महामंडळ, बीएसएनएल यांच्याशी संपर्क साधून व येण्या-जाण्याकरिता त्रासाचे व राज्य महामार्गापासून दूर, हिस्र प्राण्यांचा हैदोस असणाऱ्या परिसरात असणाऱ्या गावांचा समावेश अवघड क्षेत्रात करण्याबाबत निर्देश आहेत. करिता शिक्षणाधिकारी (प्राथ) जि.प. अकोला यांनी बदल्यासंदर्भातील माहिती तालुकास्तरावरून १६ एप्रिलपर्यंत जिल्हा कार्यालयास सादर करण्याचे निर्देश दिले; परंतु अवघड क्षेत्रातील गावांचे पुनर्विलोकन न झाल्यामुळे कोणते गाव अवघड क्षेत्रात आहे किंवा नाही याबाबत माहिती भरताना शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जर सेवा ज्येष्ठता याद्या अंतिम करण्यात आल्या तर शिक्षकांना अवघड क्षेत्रातील संगणकीकृत बदली अर्ज भरता येणार नाही. याकरिता जिल्हा प्रशासनाने अवघड क्षेत्रातील गावांची यादी तात्काळ प्रकाशित करावी, अशी मागणी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष मारोती वरोकार, जिल्हा सरचिटणीस राजेश देशमुख, अरविंद गाडगे, विकास राठोड, विनोद भिसे, सुरेंद्र सोनटक्के, राजेश वानखडे, सुधीर डांगे, गोपाल भोरखडे, दिनेश केकन, दीपक बुंदे यांनी उपशिक्षणाधिकारी दिनेश तायडे यांना गुरुवारी निवेदनाद्वारे केली आहे.

फोटो:

Web Title: Teachers' committee demands publication of list of villages in difficult areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.