कोरोना नियंत्रण मोहिमेत शिक्षकांना विमा कवचच नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:22 AM2021-04-30T04:22:49+5:302021-04-30T04:22:49+5:30
कोरोनामुळे निर्माण झालेल्या आपत्ती काळामध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षक फ्रंटलाइन वर्कर म्हणून सेवा देत आहेत. कोरोना काळात कर्मऱ्यांना ...
कोरोनामुळे निर्माण झालेल्या आपत्ती काळामध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षक फ्रंटलाइन वर्कर म्हणून सेवा देत आहेत. कोरोना काळात कर्मऱ्यांना शासनाने ५० लक्ष रुपयांचे विमा कवच दिले होते; परंतु ३१ डिसेंबर २०२० नंतर त्याला मुदतवाढ दिली नाही. मुदतवाढ देण्यात यावी. आपत्ती काळामधे सेवा देणाऱ्या शिक्षकांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या परिवाराला अद्याप कुठलीही मदत मिळाली नाही.
-प्रकाश चतरकर, राज्य उपाध्यक्ष, राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग
कोरोनासंदर्भातील कामे करण्यासाठी प्रामुख्याने सेवा कनिष्ठ शिक्षकांची नेमणूक करण्यात येत आहे. राज्यात १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षक/कर्मचाऱ्यांना पेन्शन नाही. शिक्षकांचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाल्यास विमा मिळत नाही. पेन्शन नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला सन्मानाने जगता यावे याकरिता ५० लाखांचे विमा संरक्षण अत्यंत गरजेचे आहे.
-मंगेश टिकार, जिल्हाध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना
कोरोनामुळे दुर्दैवी निधन झालेल्या शिक्षकांच्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी शासनाने इतर शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांप्रमाणे ५० लाख रुपयांचे विमा कवच द्यावे; परंतु शासनाने शिक्षकांकडे दुर्लक्ष केले आहे. शासनाला आणखी किती बळी दिले तर विमा योजना लागू होईल.
-मनीष गावंडे, राज्याध्यक्ष, खासगी शिक्षक संघटना
३७५०-कोरोना साथरोग नियंत्रण मोहिमेत सहभागी शिक्षकांची संख्या
शिक्षकांचा मृत्यू- १६
कुटुंबियांना विमा मिळाला- ००